cctv
cctv 
पुणे

सीसीटीव्ही "विव्हिंग सेंटर' केव्हा? 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय कार्यान्वित होऊन सव्वा वर्ष झाले. मात्र, शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे "विव्हिंग सेंटर' सुरू झालेले नाही. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे "असून अडचण, नसून खोळंबा' अशी स्थिती झाली आहे. 

पुणे पोलिस आयुक्तालयाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख चौकांसह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. यामध्ये पूर्वीच्या झोन तीनअंतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील क्षेत्राचाही समावेश होता. या कॅमेऱ्यांचे "विव्हिंग सेंटर' (कॅमेऱ्याने टिपलेले चित्रीकरण एकत्रित पाहण्याचा कक्ष) पुणे पोलिस आयुक्तालयात आहे. मात्र, 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्याने सर्व कामकाज स्वतंत्र झाले आहे. त्यानुसार आता आयुक्‍तालयासाठी स्वतंत्र विव्हिंग सेंटरची आवश्‍यकता आहे. आता सव्वा वर्ष उलटूनही अद्याप त्यास मुहूर्त लागलेला नाही. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारावर कारवाई केली जायची. त्यामुळे चालकांना शिस्त लागली. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये कॅमेऱ्याद्वारे होणारी कारवाई आता बंद आहे. प्रमुख चौकांसह महत्त्वाच्या ठिकाणी पूर्वी बसविलेले कॅमेरे अद्याप तसेच आहेत. मात्र, त्यातील सुस्थितीत अथवा बंद अवस्थेत किती आहेत, याबाबतची माहिती नाही. दरम्यान, एखाद्या कॅमेऱ्याने टिपलेले चित्रीकरण पाहायचे असल्यास पुणे आयुक्तालयात जावे लागते. 

पालिका हद्दीबाहेरही गरज 
आयुक्तालयात पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, चिखली, भोसरी एमआयडीसी, वाकड, सांगवी, दिघी या महापालिका हद्दीसह देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, हिंजवडी, आळंदी या नगर परिषद, ग्रामपंचायत, कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील ठाण्यांचाही समावेश झाला आहे. मात्र, महापालिका हद्दीतील ठाण्यांमध्येच सध्या सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत. मात्र, महापालिका हद्दीबाहेरील ठाण्यांतर्गतदेखील कॅमेरे बसवावे लागणार आहेत. 

सेंटर डिसेंबरअखेर पूर्ण होणार 
चिंचवड गावातील वाहतूक विभागाच्या कार्यालयात पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे स्वतंत्र "विव्हिंग सेंटर' उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी केबल टाकण्यासाठी रस्त्यावर खोदाई करावी लागणार असून, महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. पावसाळा संपल्यानंतर खोदाईची परवानगी दिली जाईल, असे पालिकेने कळविले होते. त्यानुसार या आठवड्यात परवानगी मिळणे अपेक्षित आहे. खोदाईनंतर डिसेंबरअखेरपर्यंत हे सेंटर सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT