Chain-Snaching
Chain-Snaching 
पुणे

सोनसाखळी चोऱ्या, घरफोड्यांत वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरफोडी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. शहरातील कर्वे रस्ता, खडकी, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द या ठिकाणी घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या.

एका ५६ वर्षीय महिलेने सोनसाखळी चोरीबाबत खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या पतीसह शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता खडकीतील डंकन रस्त्यावरून पायी फिरत होत्या. त्यानंतर घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली.

श्रीधर कोरे (वय २४, रा. हडपसर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते कॅबचालक आहेत. प्रवाशाला घेऊन जात असताना शनिवारी मध्यरात्री कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिराजवळ कारच्या पाठीमागून दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी गाडी अडवून कोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. विकास बधे (वय २९, रा. कोंढवा बुद्रुक) यांनी घरफोडीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते खडीमशिन चौकातील शांती हाईट्‌स या इमारतीमध्ये राहतात. १९ ऑक्‍टोबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत त्यांची सदनिका बंद होती, त्या वेळी चोरट्यांनी घरात घुसून कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मुकेश राईका (वय ३८) यांनी चोरीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे साळुंखे विहारजवळ वंदना मेडिकलचे दुकान आहे. १८ ऑक्‍टोबरला सकाळी सातला त्यांचा भाचा जितू हा दुकानामध्ये झोपला होता, त्या वेळी एक कामगार मेडिकलचे शटर थोडे उघडून लघुशंकेसाठी बाहेर गेला. त्यावेळी दुसऱ्या कामगाराने कपाटात ठेवलेली १८ लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.

तीन कोटींची फसवणूक
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालकाने कंपनीच्या कागदपत्रांचा गैरवापर करून संबंधित कंपनीच्याच नावाने दुसरी कंपनी स्थापन केली. तसेच, पूर्वीच्या कंपनीची ऑनलाइन पद्धतीने तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रजनीश कुमार (वय ४२, रा. सहरसा, बिहार) यांनी फिर्याद दाखल केली. त्यांची अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे. यामधील एक संचालक समभागधारक आहेत. संबंधित संचालकाने याच कंपनीची कागदपत्रे, लोगो, वेबसाइट, ई-मेल, भाडेकरारनामा यांचा गैरवापर करून दुसरी कंपनी स्थापन करुन ही फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT