Chandani Chowk
Chandani Chowk Sakal
पुणे

Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील रखडलेल्या उड्डाणपूलाचे उद्या उद्घाटन

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - चांदणी चौकाच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन २०१७ मध्ये झाले होते. दोन- तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आता सहा वर्षांनी म्हणजे उद्या १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे.

शहराच्या पश्चिमेचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अनेक जणांना जीव गमावले लागले. दरम्यान, येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘सकाळ' ने यासाठी बातम्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग स्वतंत्र आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते असे उपलब्ध करून देण्यासाठी उड्डाणपुलाची योजना पुढे आली होती.

उड्डाणपुलाचा आराखडा ‘आयआयटी’ मुंबईकडून तयार करून घेतला आहे. तज्ज्ञ संस्थांकडून तपासून घेतला. पुढच्या २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. असे भूमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी सांगितले होते. महापालिकेने नियोजन केलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलावा. अशी अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली होती. त्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर दिली होती.

गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन २०१७ मध्ये झाले. कोरोनापुर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१९ पर्यंत कामच सुरु झाले नव्हते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला होता. त्यानंतर, प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तरी देखील पुलाचे काम सुरू झाले नव्हते. यामध्ये, महापालिकेच्या संथ कारभारामुळे संपूर्ण भूसंपादन झाले नसल्याने उड्डाणपुलाच्या कामाला फटका बसला.

पुलाच्या कामासाठी सुमारे २७ हेक्‍टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. त्यातील सुमारे १२ हेक्‍टर जागेचे भूसंपादन महापालिकेने केले. सव्वा हेक्‍टर जागा खासगी आहे. उर्वरित जागा सरकारी संस्थांची आहे. या प्रकल्पामुळे ११६ कुटुंबे बाधित झाली. त्यांचे पुनर्वसन केले.

चांदणी चौक, दृष्टिक्षेपात

-कामाचे भूमिपूजन २७ ऑगस्ट २०१७

-नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

-कामाचे अंदाजपत्रक ३९७ कोटी

-१३.९२ भूसंपादन करावे लागले

-सप्टेंबर २०२२ चा खेळ ७१ टक्के काम पूर्ण

-१ऑक्टोबर २०२२ गडकरी यांनी केली हवाई पाहणी

-२ऑक्टोबर २००२ रोजी पूल पाडला

-यापूर्वी उद्घाटनाच्या तारखा एक जुलै, १५ जुलै जाहीर केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT