Chandni Chowk flyover project development cycle nitin gadkari chandrakant patil sakal
पुणे

Chandni Chowk Flyover : चांदणी चौक उड्डाणपूल विकासचक्राला गती

पूर्वी ३० ते ३५ हजार वाहनांची क्षमता असणाऱ्या मार्गावर आता दिवसाला दीड लाख वाहने सुसाट धावतील.

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद कानडे

पुणे : आठ रॅम्प, दोन अंडरपास, चार पूल, दोन सेवारस्ते असे मिळून सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ८६५ कोटी रुपये आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून हा प्रकल्प साकारला आहे.

पूर्वी ३० ते ३५ हजार वाहनांची क्षमता असणाऱ्या मार्गावर आता दिवसाला दीड लाख वाहने सुसाट धावतील. नूतनीकरण केलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्‍घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) होणार आहे.

पूर्वीचा चांदणी चौक...

  • मुंबईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

  • साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

  • मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

  • बावधन, मुळशी व एनडीएहून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन

  • बावधकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती

  • परिसरातील रहिवाशांना घरी किंवा बाहेर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत असे

  • परिणामी मुख्य मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत

आठ रॅम्पने बदलला चेहरा-मोहरा

  • रॅम्प-१ (मुळशी रस्त्यावरून सातारा/कोथरूडकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-२ (मुळशी रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-३ (मुळशी रस्त्यावरून बावधन/पाषाणकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-४ (कोथरूड/सातारा रस्त्यावरून मुळशीकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-५ (एनडीए/बावधन रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-६ (पाषाण/बावधन रस्त्यावरून सातारा/कात्रजकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-७ (सातारा/कोथरूड रस्त्यावरून पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)

  • रॅम्प-८ (सातारा/कोल्हापूर रस्त्यावरून मुळशी/पाषाण/बावधनकडे जाण्यासाठी)

कामाचा कालावधी : फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३

मोठा पूल : लांबी १५० मीटर, रुंदी ३२ मीटर

मुख्य रस्त्यावर : नऊ मोठे गर्डर

सेवा व अन्य रस्त्यांसाठी : ३३ छोटे गर्डर

वाहतुकीसाठी सुरक्षा : ३३ वार्डनची नेमणूक

फायदा काय?

  • परिसरातील नागरिकांना आता मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नाही

  • मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल

  • मुख्य रस्त्यावर परिसरातील वाहनांची संख्या कमी होईल

  • मुळशी, कोथरूड, बावधन आदी भागांतून येणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज नाही

  • दिवसाला दीड लाख वाहने सहजपणे धावू शकतील अशी रस्त्याची रचना

  • पुढील ५० वर्षांचा विचार करून मार्गाचे काम केल्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरी कोंडी होणार नाही.

हा बदल महत्त्वाचा

१ मुंबई-सातारा मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा.

२ सातारा-मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा.

३ मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने दोन सेवारस्ते.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो, ई-बस, रिंगरोड हा त्याचाच एक भाग आहे. चांदणी चौक प्रकल्पामुळे पुण्याच्या पश्चिमेला होणारी कोंडी कायमस्वरूपी सुटेल. पुण्याच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प आहे. त्यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला याचा आनंद आहे.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT