taware_pawre
taware_pawre 
पुणे

कारभार चुकत असेल तर कशाला मानायचं?

संतोष शेंडकर

"माळेगाव'चे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांची शरद पवार यांच्यावर टीका

सोमेश्वरनगर (पुणे) ः ""ज्यांच्या जिवावर ते पुढे गेले, त्या शेतकऱ्यांबाबत ह्यांनी काय विचार केला? जोवर चांगला कारभार करत होता, तोवर मानलं. कारभार चुकत असेल तर कशाला मानायचं? पन्नास वर्ष आपण त्यांना विसरलो नाही. ते मात्र आपल्याला विसरले,'' अशा शब्दांत माळेगाव साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

दरम्यान, आगामी काळात गुजरातमधील साखर कारखान्यांच्या जवळपास जाणारा भाव उसाला "माळेगाव'कडून देऊ, असा शब्दही त्यांनी दिला.


उसाला राज्यात सर्वोच्च भाव दिल्याबद्दल मुरूम (ता. बारामती) येथे माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात तावरे बोलत होते.

""एक मोटारसायकल आम्ही आलटून पालटून चालवायचो. शेतकऱ्यांचं भलं करण्याचा विचार त्यावेळी असायचा. ही मंडळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत होती. "नीरा-देवघर'चा करार संपणार आहे, हे त्यांना माहीत नव्हतं काय? "नीरा देवघर'च्या पाण्यावर आपला अधिकार नाही. दोनच आवर्तने मिळाली तर शेती कशी पिकेल? नेतेमंडळींनी हा विचार कधी केला नाही. आता बंद पाइपमधून पाणी आणून ठिबकवर शेती करावी लागेल. झोनबंदी कायद्यात आणि विस्तारीकरणाच्या न्यायालयीन अडथळ्यात माळेगाव कारखान्याच्या प्रयत्नांमुळे दुरुस्ती झाली. आता प्राप्तिकराने कारखान्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे सगळ्यांनी मिळून सरकारकडे जावे लागेल, ते मदत करतील. जो मदत करेल, त्याच्याशी संगत करू,'' असे सूतोवाचही तावरे यांनी केले.



"अजितरावांना दुःख वाटतंय'
""ऑनलाईन निविदापद्धतीमुळे पाच ते पस्तीस टक्‍क्‍यांनी किमती घटल्याने वर्षात माळेगाव कारखान्याचे दहा कोटी वाचले. स्टोअर खरेदी नऊ कोटींहून सहा कोटींवर आणली. राष्ट्रवादीच्या एका कारखान्याची गोदामाची निविदा 9 टक्के वाढीव जाताना आमच्या गोदामाची निविदा त्याच दिवशी 19 टक्‍क्‍यांनी कमी गेली. अशा काटकसरीमुळेच आम्ही सभासदांना सर्वोच्च भाव दिला. मात्र, अजितरावांना याचं दुःख वाटतंय. त्यांच्या दौंड शुगरने सभासदांना 2800 रूपये भाव दिला, तर आम्ही "गेटकेन'ला राज्यातील सर्वाधिक 2850 भाव दिला आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे लुटारू आहात,'' अशा शब्दांत "माळेगाव'चे अध्यक्ष रंजन तावरे यांनी टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT