Satbara
Satbara 
पुणे

घरांच्या नोंदीसाठी सातबाराच्या नमुन्यात बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ग्रामीण भागात परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या इमारतींमधील सदनिकांची जमिनीच्या मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा जमिनींवर उभ्या असलेल्या गृहप्रकल्पांची नोंद घेण्यासाठी सातबारा उताऱ्यातील बारा काढून त्या ठिकाणी सात ‘क’ आणि ‘ड’ असा नमुना नव्याने तयार करण्यात आला आहे. सात ‘क’मध्ये गृहप्रकल्पातील मोकळ्या जागांचा, तर सात ‘ड’मध्ये प्रत्येक सदनिकाधारकाच्या मालकी हक्काची नोंद घालण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात सदनिकांचा कोणताही अभिलेख नसतो. सातबारा उताऱ्यावर संबंधित बांधकाम विकसकाचे नाव राहते. सदनिकाधारकांच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर होत नाही.

या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने पावले उचलली आहेत. ग्रामीण भागातील सदनिकाधारकांच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर सात ‘क’मध्ये घेतली जाणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी या समितीने कार्यपद्धत निश्‍चित केली आहे. या समितीची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यात आला. त्यातील ‘बारा’ हे काढून टाकण्यात आले आहे. त्याऐवजी सात ‘क’ आणि सात ‘ड’ असे दोन नमुने तयार करण्यात आले असून, त्यानुसार नोंदी घालण्यास सुरुवात करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

सदनिकांची सात ‘क’ आणि ‘ड’ उताऱ्यावर नोंद घेतल्याने घरमालकांना मालकी हक्काचा अभिलेख मिळणार आहे. या अभिलेखात सदनिकेचे एकूण क्षेत्र, इमारतींमधील ॲमेनिटी स्पेस आदींची नोंद असणार आहे. यामुळे सदनिकाधारकांना कर्ज मिळणे, मालमत्ता गहाण ठेवणे आदी सोईस्कर होणार आहे. देशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील सदनिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्याचा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील गृहप्रकल्पांची नोंद घेण्यासाठी सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंद घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
- रामदास जगताप, ई-फेरफार प्रकल्पाचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT