Eknath Shinde and Nana Patekar
Eknath Shinde and Nana Patekar sakal
पुणे

Eknath Shinde: नाना पाटेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठी बनवलं खास चुलीवरचं पिठलं!

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नानांच्या घरी येऊन गणपतीचे दर्शन झाल्यानंतर जेवण केले. सकाळ पासून मुख्यमंत्र्यांनी जेवण केलेले नव्हते.

खडकवासला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नानांच्या घरी येऊन गणपतीचे दर्शन झाल्यानंतर जेवण केले. सकाळपासून मुख्यमंत्र्यांनी जेवण केलेले नव्हते. त्यासाठी नानांनी स्वत: चुलीवर पिठलं केले होते. त्यांच्या शेतातील केळाचे शिकरण यासोबत भाकरी, पालेभाज्या वरणभात असा जेवणाचा बेत होता. नानांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी सर्वांना आग्रहाने पोटभर जेऊ घातले.

सिंहगड पायथ्याला डोणजे गावातील पायगुडेवाडी येथे 'नानाची वाडी' नावाचा फार्म हाऊस आहे. मुख्यमंत्री संध्याकाळी पावणे पाच वाजता पोचले. सहा वाजता ते मुंबईला निघाले. सुमारे सव्वा तास येथे रमले होते. मुख्यमंत्र्यांच्या सोबत यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री विजय शिवतारे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्वचे सहसंचालक विलास वाहने, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते. त्यांनीही जेवण केले.

'मी नानाच्या घरी आलो. त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. 3- 4 दिवसांपूर्वी नानांचा फोन आला होता. पुण्यात येणार असाल तर या. त्यांनी आग्रह केला नव्हता तरी आलो. नाना पाटेकर माझे आवडते अभिनेते आहेत. आमची मैत्री आहे. मी कोरोनामुळे आजारी असताना त्यांचे अनेक चित्रपट पाहिले', असे CM शिंदेंनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या भागात निसर्ग संपदा आहे. सिंहगड आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी आहे. निसर्गाच्या सानिध्यात घर आहे. नानांचं सिलेक्शन चांगलं आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामफळाचे झाड लावण्यात आले. त्याचबरोबर दगडात बांधलेले नवीन गेस्ट हाऊसही पाहिले. दगडी बांधकामांबाबत माहिती घेतली.

मागील वर्षी पावसाळ्यात सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ४५ गावांमध्ये काम केले होते. अति मुसळधार पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली होती. नाम फाउंडेशनने सगळ्या शेतकऱ्यांची शेती दुरुस्ती करून दिली होती. ही माहिती एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्याकडून मिळाली होती. शिंदे यांनी दहा लाख रुपयांची मदत 'नाम'ला केली होती. त्याचप्रमाणे चिपळूणच्या शिवनदीचे काम चांगले झाल्यामुळे यावेळी चिपळूण शहर पुरातून वाचले. नामच्या सर्व कामाचे कौतुक करून त्यांनी नामच्या पदाधिकारी म्हणून मला काही कामे सांगा असे नानांच्याकडे इच्छा व्यक्त केली. तर नानांनी मुख्यमंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

Ravindra Waikar : वायकरांच्या मतदारसंघात खरंच निकाल बदलला का? मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? कीर्तिकरांनी सांगितला घटनाक्रम

Indus Battle Royale: बॅटल रॉयलचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

SCROLL FOR NEXT