Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhe sakal
पुणे

Dr. Neelam Gorhe : मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार

समाधान काटे

शिवाजीनगर - 'शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार.' असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेना भवन येथे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगीरे, पूजा रावेतकर, सुधीर कुरूमकर, कांता पांढरे, अॕड.गितांजली ढोणे , सीमा कल्याणकर, सारिका पवार , रंजना कुलकर्णी, शर्मिला येवले यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं आहे. शहरात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असून त्या ठिकाणी असलेला राडा रोडा, धूळ ताबडतोब हटवावी.

मेट्रोच्या वतीने नेमण्यात आलेले वॉर्डन्सची संख्या वाढवली पाहिजे, त्यांना गणवेश दिला पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाने शहरातील नव्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्याचा समावेश वाहतूक कोंडीच्या यादीत केला पाहिजे. तसेच लवकरच पुणे जिल्हा नियोजन निधीला अंतिम स्वरूप मिळणार आहे. शहरासह ग्रामीणसाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा.' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस शहरात विविध कार्यक्रम

९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभर जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळी ८ वा. मंदिरात महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ८ व ९ फेब्रुवारी रोजी शहरात रूग्ण सेवा, ज्येष्ठांचे सत्कार इतर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT