Lift
Lift 
पुणे

लिफ्टमध्ये अडकून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - खेळताना चुकून लिफ्टमध्ये अडकल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पाच वर्षीय चिमुरडीची अग्निशामक दलाचे जवान व स्थानिक नागरिकांनी सुटका केली. मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घोरपडी पेठेतील सोसायटीत शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.

नशरा रहेमान खान (वय ५) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडी पेठेत झोरा कॉम्पलेक्‍स ही आठ मजली इमारत आहे. येथे नशराची आजी राहते. नशरा आई-वडिलांसह आजीकडे आली होती. नशराचे कुटुंबीय घरात होते. त्या वेळी नशरा खेळताना लिफ्टमध्ये गेली. त्या वेळी लिफ्ट चौथ्या मजल्यावर जात होती. लिफ्ट व चौथ्या मजल्यावरील भिंतीमध्ये अडकून ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, नशरा दिसत नसल्यामुळे पालकांनी शोध घेतला. त्यानंतर नशरा लिफ्टमध्ये अडकल्याचे सोसायटीतील लोकांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ अग्निशामक दलास बोलाविले व रहिवाशांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान व नागरिकांनी प्रयत्न करून तिला बाहेर काढले. नशराला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT