rohan waghmare sakal
पुणे

Old Sangvi : उद्यानात हरवलेला चिमुकला आई-वडीलांच्या कुशीत विसावला

अवखळ लहान मुलांना आई-वडीलांशिवाय दुसरं कुणी सांभाळणं हे दिव्यच, आई वडीलांशिवाय स्वतःच्या मुलांची दुसरं कोणी काळजी घेवू शकत नाही.

रमेश मोरे

जुनी सांगवी - अवखळ लहान मुलांना आई-वडीलांशिवाय दुसरं कुणी सांभाळणं हे दिव्यच, आई वडीलांशिवाय स्वतःच्या मुलांची दुसरं कोणी काळजी घेवू शकत नाही. याचा प्रत्यय पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात आला. येथे एक चिमुकल्याला शेजा-यांसोबत उद्यानात खेळण्या बागडण्यासाठी सोबत पाठवले होते.

मात्र शेजा-यांच्या स्वत:चे सेल्फी, फोटो काढणे इतर स्वतःच्या नादात दुसऱ्याचा सोबत आणलेला लहान चिमुकला विसरल्याने तो हरवला. यापुढे त्यांना सोबत शेजारच्या लहान मुलाला आपण सोबत आणले होते, याचे भान राहिले नाही.

एका तिस-याच व्यक्तीच्या हाताला धरून हा चिमुकला भरकटला. तो चिमुकला त्या व्यक्तीचा हात सोडत नसल्याने तो व्यक्तीही अचंबित झाला. प्रसंगी उद्यान परिसरात कर्तव्यावर असलेल्या सांगवी पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकातील महिला पोलिस सुनिता जाधव, प्रियंका गुजर यांची गोंधळलेल्या अवस्थेत मुलाला धरून चाललेल्या त्या व्यक्तीकडे लक्ष गेले.

पोलिस भाषेत त्यांनी काय रे मुल तुझं का विचारल्यावर त्याने नाही म्हणताच या दोन्ही दामिनींनी त्या चिमुकल्याला ताब्यात घेतले. तो हरवला असल्याची या पोलिस कर्मचाऱ्यांना खात्री झाली. उद्यानात शोधाशोध केल्यावर एव्हाना भानावर आलेल्या त्या शेजा-यांच्या ही गोष्ट लक्षात आली व पोलीसांसमोर हा मुलगा आमच्या सोबत आहे.

आम्ही त्याला बागेत घेऊन आलो. आमच्या शेजा-यांचा आहे.असे पोलिसांना सांगितले. मात्र खातरजमा केल्याशिवाय मुल ताब्यात देणार नाही, असे पोलिसांनी म्हटल्यावर त्या मुलाच्या आई-वडिलांना बोलावून या दामिनींनी त्या चिमुकल्याला आई वडीलांच्या स्वाधिन केले.

सध्याच्या धकाधकीच्या काळात आई वडीलांनी स्वतची मुले स्वतः काळजी पूर्वक सांभाळावित. कुणाच्या स्वाधिन करून बिनधास्त राहू नये. काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले. अशा प्रसंगांमुळे अनेक घटना, गुन्हे घडतात. पालकांनी जागरूक असायला हवे. मनोज वाघमारे हे इंदिरा वसाहत गणेश खिंड रोड कस्तुरबानगर औंध येथे राहतात. ते गवंडी काम करतात.

पत्नी आशा वाघमारे घरकामे करुन संसाराचा गाडा हाकतात. मुलगा रोहन वाघमारे (वय-४ वर्षे) यास त्यांच्या शेजारील रहिवासी रेखा सुर्यवंशी (वय-३६) मुलगा स्वप्नील सुर्यवंशी, सायली सुर्यवंशी, समृद्धी सुर्यवंशी यांनी रोहन यास सोबत उद्यानात आणले होते.

शेजार धर्म व मुलाला लावलेला लळा यामुळे रोहनच्या आई वडीलांनी शेजा-यांसोबत रोहनला सोडले होते. यातून कीतीही सख्य असले तरी पालकांनी जागरूक राहून मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. रोहनच्या आई-वडीलांना बोलावून पोलिसांनी रोहनला आई-वडीलांच्या स्वाधिन केले. यामुळे पालकांनी ही बोध घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT