Citizen crowd for grocery shopping
Citizen crowd for grocery shopping 
पुणे

Corona Virus : कोरोनाच्या धास्तीने किराणा दुकानात नागरिकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड(पुणे) : कोरोना व्हायरचा नागिरकांनी चांगलाच धसका घेतला आहे. गुलटेकडी येथील भुसार बाजारात सोमवारी किराणा माल खरेदी करण्यासाठी छोटे दुकानदार आणि नागरिकांची यांची झुंबड पाहायला मिळाली. यामुळे बाजार सर्वत्र गर्दी पाहवयास मिळाली. यामुळे बाजारात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. शहरातील नागरिक महिनाभराचा किराणा माल एकदाच भरून साठवणूक करत आहेत.

Corona Virus : अफवा पसरविणाऱयां दोघांविरोधाात पुण्यात पहिला गुन्हा दाखल 

दररोजच्या तुलनेत बाजारात २० ते ३० टक्क्यांनी गर्दी वाढली आहे. तसेच घाऊक बाजारात ही धान्य खरेदीसाठी १० ते १५ टक्के ग्राहकांची संख्या वाढली आहे. सध्या नागिरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने शहरातील मॉल बंद केले आहेत. मॉल प्रमाणे बाजारपेठा ही बंद होतात की काय याची भीती नागरिकांनी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक एक महिन्याचा किराणा माल भरत आहेत.

CoronaVirus : पुणेकरांच्या जीवनशैलीत असा झाला अचानक बदल

शहरातील अनेक मॉल बंद झाले आहेत. यामुळे किराणा माल खरेदी करणारा ग्राहक सोमवारी मोठ्या प्रमाणावर सुपर मार्केट, छोटे दुकानदार आणि मार्केट यार्डातील किरकोळ दुकानदार यांच्याकडे वळला आहे. तसेच शहरातील छोट्या दुकानदारांकडून घाऊक बाजारातून मालाची खरेदी वाढली आहे. पुढील दोन तीन दिवसात ती अजून वाढण्याचा अंदाज असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी राजेंद्र बाठीया यांनी दिली.

CoronaVirus : गजबजलेल्या तुळशीबागेत आता फक्त शुकशुकाट
दिवाळीपेक्षा जास्त खरेदी

शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर किराणा माल खरेदी करत आहेत. दिवाळी किंवा इतर सणापेक्षा जास्त मागणी किराणा मालाची वाढली आहे. नागरिक साधारणतः पंधरा दिवस ते एक महिन्याचा माल भरून ठेवत आहेत.
- जसराज चौधरी, व्यापारी, मार्केट यार्ड.
 

नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती घेतली आहे. त्यामुळे किराणा मालाची मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात डी मार्ट आणि सुपर मार्केट आणि छोट्या दुकानदारांकडून धान्याची मागणी वाढली आहे.
- राजेश शहा, व्यापारी, मार्केट यार्ड.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT