सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - जयकर ग्रंथालयाचा वाचन कक्ष बंद करण्यात आल्यानंतर अभ्यासाचे साहित्य नेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - जयकर ग्रंथालयाचा वाचन कक्ष बंद करण्यात आल्यानंतर अभ्यासाचे साहित्य नेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. 
पुणे

पुणे विद्यापीठातील अध्यापन बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कोरोनासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून अनिश्‍चित काळासाठी शैक्षणिक विभागांचे अध्यापनाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रशासकीय आणि इतर कामकाज चालू राहणार आहे.

विद्यापीठाच्या वतीने यासंबंधीचे परिपत्रक शनिवारी काढण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जयकर ग्रंथालयासहित सर्व वाचन कक्ष, अभ्यागत निवास, कमवा व शिका योजना, व्यायामशाळा, सर्व क्रीडा सुविधा, पाळणाघर, उद्याने आणि अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर वाहनसेवा बंद करण्यात आली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुटीच्या काळात अनावश्‍यकरीत्या फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थी फिरताना दिसल्यास त्यांना मूळ गावी जाण्याची सूचना देण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

नागरिकांना प्रवेशास बंदी 
विद्यापीठात विनापरवानगी येणाऱ्या अभ्यागतांना या कालावधीत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच, सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी, त्यांचे नातेवाईक यांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. या काळात प्रवेशद्वारावरील बायोमेट्रिक सुविधा बंद राहील.

शहरातील महाविद्यालयांत शुकशुकाट
राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, जिम, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात आज सगळीकडे शुकशुकाट जाणवला. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नेहमी गजबजणाऱ्या सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता आदी ठिकाणी गर्दी कमी होती. महाविद्यालयांची आवारे, संकुले, वाचन कक्ष यांसह शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या खासगी अभ्यासिकांमध्ये आज शुकशुकाट होता. काही क्‍लासचालकांनी विद्यार्थ्यांना आठवडाभराची सुटी जाहीर केली आहे. आठवडाभरानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे क्‍लासचालकांच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT