मुनोत सभागृह - ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’ प्रदर्शनात स्वतः बनविलेल्या प्रकल्पाची माहिती पालकांना देताना विद्यार्थी.
मुनोत सभागृह - ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’ प्रदर्शनात स्वतः बनविलेल्या प्रकल्पाची माहिती पालकांना देताना विद्यार्थी. 
पुणे

मुले रमली तंत्रज्ञानात... (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. यासाठीच ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’च्या माध्यमातून ८ ते १४ वयोगटातील मुलांनी बनविलेल्या मोबाईल ॲप, वेबसाइट, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘प्रोग्रा मित्र व प्लेझ्मो’ यांच्यातर्फे पत्रकारनगरमधील मुनोत सभागृहात हे आगळे-वेगळे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे ‘सकाळ’ प्रायोजक होते.
मोबाईल ॲप, व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर आदींवर तासन्‌तास वेळ वाया घालवणाऱ्या मुलांमुळे त्रस्त झालेले पालक आपण पाहिले आहेत; पण हीच मुलं त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण गोष्टी स्वतः बनवू शकतात, हेच या प्रदर्शनातून दिसले. 

प्रदर्शनाचे समन्वयक व प्रोग्रा मित्रच्या संस्थापक निशिगंधा पळशीकर म्हणाल्या, ‘‘तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. त्याचा वापर करताना ते कसे चालते, बनवले जाते हे समजून घेऊन मुलं स्वतः ते बनवितात तेव्हा त्यांचा तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.  कल्पनांच्या जोरावर मुलांनी ‘ई कॉमर्स प्रोजेक्‍ट, ऑनलाइन शॉपिंग ॲप, सुपर मार्केट बिलिंग ॲप, फळांपासून संगीतनिर्मिती, रोबोट, मशिन अशा अनेक गोष्टी बनविल्या आहेत.’’ 

प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थी ८८, ८ ते१४ वयोगट, १०० हून अधिक प्रकल्प, ४५ शाळांचा सहभाग

आम्हाला या प्रदर्शनात येऊन आमची कल्पना मांडायला मिळाली. आम्ही ‘हॅरी पोर्टर’ या विषयावर प्रश्नोत्तराचा एक प्रोग्रॅम बनविला आहे.
- प्रिशा पाचपोरे, विद्यार्थिनी

तंत्रज्ञानाचे ज्ञान लहानपणापासून असणे आवश्‍यक झाले आहे. अशावेळी या प्रदर्शनाचे महत्त्व खूप आहे. यातून मुलांच्या कल्पनांना वाव देण्याची संधी मिळते. 
- स्वप्ना देशपांडे, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT