पुणे

पुण्यासह राज्यात थंडीची चाहूल 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू किनारपट्टीलगतच्या समुद्रात "गज' हे चक्रीवादळ घोंगावत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे तमिळनाडू किनारपट्टीच्या उत्तरेकडील भाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, पुण्यासह राज्यातील किमान तापमानात घट होत असून, थंडी पडू लागली आहे. 

हे चक्रीवादळ चेन्नईपासून 860 किलोमीटर, तर श्रीहरीकोटापासून 900 किलोमीटरवर असून, ते किनारपट्टीलगत सरकत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनाऱ्यावर जोरदार पावसाची शक्‍यता असून, समुद्रही खवळलेला राहील, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. 

दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात थंडी जाणवू लागली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमान घटले आहे. रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी घट झाल्याने नागपूर, गोंदिया, अकोला, ब्रह्मपुरी परिसरात थंडी जाणवत आहे. राज्यात रविवारी नागपूरमध्ये नीचांकी 11.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुण्यात 15 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. 

राज्यात दिवसभर आकाश निरभ्र असल्याने दुपारी उन्हाचा चटका, तर सायंकाळनंतर हवेत गारवा जाणवत आहे. रात्री गारठ्याने अंग शहारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT