पुणे

पुणे विद्यापीठामध्ये आजपासून ‘सहयोग’

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन ॲण्ड लिंकेजेस्‌ यांच्या वतीने शुक्रवारी (ता. ८) आणि शनिवारी (ता. ९) ‘सहयोग’ या इनोव्हेशन कॉनक्‍लेव्हचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्‌घाटन सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागातील (पुम्बा) सभागृहात दुपारी साडेचारला होणार आहे.

या परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, विद्यापीठांतर्गत इनोव्हेशन आणि स्टार्ट-अप कक्ष स्थापन केलेल्या शंभर महाविद्यालयांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात नवकल्पनांची गरज, त्याबाबतच्या समस्या, नावीन्यपूर्ण पद्धतीने कशा सोडवाव्यात, या मुद्‌द्‌यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच कोणत्याही नवोद्योगात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात येईल. या दोन दिवसांच्या परिषदेत २३ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यात ‘स्टार्ट-अप इंडिया’चे मिलिंद कांबळे, आनंद चोरडिया, इनोवेटिव्ह डिझाइनतज्ज्ञ अश्‍विनी देशपांडे, गीतेंद्र करमळकर, समीर जैन यांचा समावेश आहे, असे केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT