junnar
junnar 
पुणे

ओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन

पराग जगताप

ओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली निर्माल्य संकलित झाले असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे ओतूर शाखेचे अध्यक्ष स्त्रीरोगतज्ञ डॉ.वैभव गायकर व सरपंच बाळासाहेब घुले यांनी दिली.

भारत विकास परिषद ओतूर शाखा तसेच ग्रामपंचायत ओतूर व शिवसह्याद्री युवामंच यांच्या वतीने सलग चौथ्यावर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम मांडवी नदी किनारी राबविण्यात आला.या उपक्रमात  निर्माल्य संकलाना केल्यामुळे मांडवी नदीचे संभाव्य प्रदूषण मोठ्या प्रमाणात टाळले गेले आहे.

निर्माल्य संकलनासाठी ओतूरला मांडवी नदीकाठीच्या श्री.कपर्दिकेश्वर मंदिर घाट व के.टी बंधार्‍याजवळ जेथे नागरिकांकडून गणेश विसर्जन केले जाते.तेथे गणेशोत्सव काळात या दोन्ही ठिकाणी ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली ठेवून त्यात निर्माल्य व प्लॅस्टिक कचरा वेगवेगळा गोळा करण्यात आला.या उपक्रमाचे उद्घाटन उपसरपंच सुशिला जाधव यांनी उद्घाटन केले.

या उपक्रमासाठी धनंजय डुंबरे, मच्छिंद्र डुंबरे, दिपाली डुंबरे, बाळासाहेब साबळे, सुभाष मूळे, डॉ.रोहिणी गायकर, गौरव डुंबरे, संतोष डुंबरे, जयदिप डुंबरे, शंकर बोर्‍हाडे, रोटरी क्लब ओतूर व शिवसह्याद्री यूवा मंचाचे सर्व सभासद यांनी सहकार्य केले.

संकलित झालेले सर्व निर्माल्य संजय लंबे व सचिन वाकचौरे यांच्या खतनिर्मिती प्रकल्पास देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT