पुणे

शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद : जावडेकर

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबरोबर गुणवत्तावाढीसाठी केंद्र सरकारने पावले उचचली आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. 47 हजार कोटी रुपये असलेली तरतूद गेल्या चार वर्षांत सव्वालाख कोटींपर्यंत वाढविली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. 

धनकवडी परिसरातील भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या विसाव्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी संत शिरोमणी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते. 

समग्र शिक्षा, रुसा, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे दिले जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत अर्थसंकल्पात वाढ केली असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "पदवी प्रमाणपत्रावर फोटो अनिवार्य केला आहे. प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजिटल अथवा प्रिंटेड कॉपी विनासायास उपलब्ध होईल. तसेच, सर्व संबंधितांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तत्काळ पडताळून पाहणे शक्‍य होणार आहे. डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून 1 लाख 80 हजार ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.'' 

कुलपती डॉ. कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. डॉ. साळुंखे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. 

पदवीप्रदान समारंभाच्या पोशाखात बदल 

पदवीप्रदान समारंभाच्या वेळी पोशाखात बदल करण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार 500 विद्यापीठांनी भारतीय पोशाख बदललेले आहेत. संबंधित विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिझाइननुसार पोशाख सर्वांना बंधनकारक केले आहेत, असे सांगत अन्य विद्यापीठांनीही विद्यार्थ्यांच्या डिझाइननुसार पदवीप्रदान समारंभाच्या पोशाखात बदल करावेत, असे जावडेकर यांनी सूचित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT