A computer expert with his mother and father died in accident
A computer expert with his mother and father died in accident 
पुणे

संगणक तज्ञ मुलासह आई वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत जवळ असलेल्या ताजे (ता. मावळ) येथे मंगळवारी (ता. 4) कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मुलगा व त्याच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चांडोली बुद्रुक गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

नितीन मारुती थोरात (वय 30), वडील मारुती भाऊ थोरात (वय 58) आई शांताबाई मारुती थोरात (वय 55) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मारुती थोरात हे किडनीच्या आजाराने आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले. मंगळवारी दुपारी टाटा बोल्ट गाडीतून द्रुतगती मार्गावरून मंचर कडे येत होते. नितीन गाडी चालवत होता. रस्त्यात कंटेनर (एम. एच 46 ए एफ. 0410) रस्त्यात उभा होता. बंद पडलेल्या कंटेनरच्या मागे कुठलाही अडथळा उभा केला नव्हता. त्यामुळे कंटेनर उभा असल्याचे नितीन यांच्या लक्षात न आल्याने भीषण अपघात झाला.

मारुती थोरात यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. शांताबाई थोरात व नितीन थोरात हे गंभीर जखमी झाले. जखमींना कामशेत पोलिसांनी उपचारासाठी निगडी येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर नितीन थोरात यांचे बंधू अर्जुन थोरात नातेवाईकांसह प्रथम कामशेतला गेले.

शांताबाई थोरात यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मारुती थोरात व शांताबाई या दाम्पत्यावर बुधवारी सकाळी चांडोली बुद्रुक येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सावडण्याच्या विधीची तयारी सुरु असताना निगडी येथील हॉस्पिटल मध्ये नितीन यांचा निधन झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर थोरात कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला. नितीन थोरात यांनी मंचर मध्ये मोरया एन्टरप्रायजेस हा व्यवसाय सुरु केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT