congress campaign started for Pune Lok Sabha Constituency
congress campaign started for Pune Lok Sabha Constituency 
पुणे

Loksabha 2019 : पुण्यात उमेदवाराविनाच काँग्रेसने फोडला प्रचाराचा नारळ

सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
पुणे : पुण्यात अखेर काँग्रेस आघाडीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. कसबा पेठ परिसरात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करुन ढोलताशाच्या गजरात नारे लगावले. पुण्यातून काँग्रेस उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात असले तरी उमेदवाराशिवाय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढत प्रचाराला सुरवात केली आहे.

यावेळी 'चौकीदार चोर है' च्या घोषणांनी सर्व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तसेच पक्षाने कोणताही उमेदवार दिल्यास तो बहुमताने विजयी करण्याचा निर्धार पक्ष कार्यकर्त्यांनी केला. या पदयात्रेत हातात झेंडे घेऊन महिलाही सहभागी झाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रचारासाठी खासदार वंदना चव्हाण, रमेश बागवे, चेतन तुपे, अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी सहभागी आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. 

त्वष्टा कासार मंदिर, पवळे चौक, साततोटी चौक, फडके हौद, आरसीएम गुजराथी हायस्कूल या मार्गाने पदयात्रा जाणार असून नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ समारोप होईल. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनासाठी काँग्रेसकडून नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT