corona1 
पुणे

मुळशीच्या अतिदुर्गम भागातही कोरोनाचा धोका  

राजेंद्र मारणे

भुकूम (पुणे) : मुळशी धरण भागातही कोरोना पोहचला आहे. तसेच, तालुक्यातील प्रत्येक खोऱ्यात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. मोठ्या गावातून दररोजचे रूग्ण सापडत असून, सहाशेचा टप्पा ओलंडला आहे. दरम्यान, आज 11 रूग्ण सापडले असून, दररोजच्यापेक्षा संख्या निम्म्याने कमी असून, मुळशीकरांना दिलासा देणारा आकडा आहे.

मुळशी धरण भागातील वांद्रे ग्रामपंचायतीच्या गोठा वस्तीमधील महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पौड येथील ग्रामिण रूग्णालयात तीने गर्भवतीची तपासणी केली. त्यानंतर पुणे येथे ससून रूग्णालयात तीने करोनाची तपासणी केली. तीला सौम्य लक्षणे आहेत.

दरम्यान, तालुक्यातील कोळवण खोरे येथे चाले, हाडशी, काशिग, दखणे, मुठा खोरेत माळेगाव, आंदगाव, रिहे खोरेत मातेरेवाडी, रिहे गावातून रूग्ण आढळले आहेत. तालुक्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 617 रूग्णांपैकी 253 दवाखान्यात असून, 353 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच, आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून, चार जण आयसीयूमध्ये आहेत.

दरम्यान, लाॅकडाउन उघडले असले, तरी व्यापार व व्यवहारातील उलाढाल मंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असते. तसेच, हाॅटेल, पर्यटनावर बंदी असल्यामुळे वाहतूक कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT