पुणे

पुण्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा गोंधळ; दुसरा डोस मिळेना

गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना लसीकरण वेगाने होत असल्याचे दाखविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ पहिल्या डोसवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे दुसऱ्या डोसकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील कोरोना लसीकरणाची स्थिती पहिला डोस जोमात, दुसरा डोस कोमात अशी झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुसरा डोस मिळेनासा झाला आहे. अनेकांना ४५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप दुसरा डोस मिळू शकलेला नाही. मुदतीत डोस मिळणार नसेल तर, अशा लसीकरणाचा उपयोग काय, असा सवाल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे यांनी केला आहे. पुणे जिल्ह्यात १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर किमान २८ आणि कमाल ४५ दिवसांनंतर दुसरा डोस मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात काही नागरिकांना ६० दिवस होऊनही हा डोस मिळू शकला नसल्याचे जगदाळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ ४७ टक्के कर्मचाऱ्यांनाच दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन वर्करच्या लसीकरणाचीही अशीच अवस्था आहे. केवळ ३६ टक्के वर्कर्सना दुसरा डोस मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात लसीकरण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांपैकी केवळ ७ टक्के नागरिकांना तर, ४५ ते ५९ या वयोगटातील केवळ दोन टक्के लोकांना दुसरा डोस मिळू शकला आहे. पुणे जिल्ह्यात २६ एप्रिलपर्यंत एकूण ९ लाख ८ हजार ७७६ जणांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी ८ लाख ९ हजार ८०६ जणांना पहिला तर केवळ ९८ हजार ९७० जणांचाच दुसरा डोस मिळाला आहे.

आधी वेळेत दुसरा डोस द्या - जगदाळे

कोरोना प्रतिबंधासाठीच्या जिल्हा परिषदेच्या अनेक योजना अपयशी ठरू लागल्या आहेत. लसीकरणही त्याच मार्गाने चालले आहे. सध्या केवळ पहिल्या डोसवर भर दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागात दुसरा डोस मिळतच नाही. वेळेत दुसरा डोस मिळणार नसेल तर, या लसीकरणाचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे केवळ आकडेवारी वाढवू नका. आधी दुसरा डोस वेळेत द्या, अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडे केली आहे.

संवर्गानिहाय झालेले लसीकरण

- संवर्ग ---- पहिला डोस ---- दुसरा डोस ---- दुसऱ्या डोसची टक्केवारी

- आरोग्य कर्मचारी ---- ४७७०६ ---- २१ हजार ९०६ ----- ४७ टक्के.

- फ्रंटलाइन वर्कर ----- ७९ हजार ८६१ ----- २६ हजार २८ ----- ३६ टक्के

- ज्येष्ठ नागरिक ---- ३ लाख ५२ हजार ६४१ ---- ३४ हजार ३५६ ----- केवळ ७ टक्के.

- ४५ वर्षापुढील ---- ३ लाख २९ हजार ५९८ ---- १६ हजार ६१० ----- केवळ २ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT