bopodi.jpg 
पुणे

...न थकता `ते` करताहेत कोरोना बाधितांची सेवा

बाबा तारे

औंध (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात सुरु झाल्यानंतर बोपोडी येथील कै. द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह सर्व कर्मचारी रुग्णांची अविरत सेवा करत आहेत. घरच्या जबाबदा-या सांभाळत रुग्णालयात रुग्णांची सेवा करतांना कुठलीही तक्रार न करणाऱ्या  डॉक्टर, सर्व परिचारिका, मावशी यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. दिवस- रात्र कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग कुठल्याही सुट्टी व रजेची अपेक्षा न करता सतत कार्यरत आहे.

केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर येथे दाखल झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही येथील डॉक्टर,  कर्मचारी करत आहेत. यामुळे येथील रुग्णांना घरच्या सारखा मानसिक आधार मिळतो आहे. त्याचप्रमाणे योग्य औषधोपचार, तपासणी व जेवणाची वेळच्यावेळी सोय केली जात असल्याने रुग्णांना घरच्यासारखी सेवा मिळत आहे. याचे त्या रुग्णांच्या कुटुंबियांनाही समाधान मिळते. रुग्णालयातील काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या जवळ असतानाही वयाचा कुठलाही बाऊ न करता मनापासून रुग्णांची सेवा करताहेत.

कोरोनाचे उपचार केंद्र सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत सर्वच रुग्णांची दिवसातून तीन वेळा तपासणी करुन त्यांना वेळोवेळी डॉक्टरांकडून सल्ला दिला जात आहे. राष्ट्रीय आपत्ती असल्याने आपली कर्तव्य भावना जपत सर्वजण मनापासून  काम करत आहेत. सुरुवातीला या रुग्णालयात १९ मार्चपासून रुग्णांना क्वारंटाईन करायला सुरुवात झाली होती. परंतु रुग्ण संख्या वाढून इतर रुग्णालयात जागा कमी पडू लागल्याने १४ एप्रिल पासून प्रत्यक्ष  रुग्णांना येथे दाखल करण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत साडेतीन हजाराहून अधिक स्वॅब तपासणी केली गेली आहे. तर आजपर्यंत १९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर पन्नास रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती बढिये यांच्यासह डॉ. वैशाली ब्रम्हे, डॉ. ललित पाटील, डॉ. निलिमा चौधरी व डॉ. आत्मिका नायर यांनी या रुग्णालयात तपासणीपासून ते रुग्णांना डिस्चार्ज मिळेपर्यंत जबाबदारीने सेवा दिली आहे. याबरोबरच परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एंट्री आॅपरेटर, इतर मदतनीस, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, रक्त तपासणीस यांचाही यात मोलाचे कार्य आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत होता. तेव्हापासून येथील सर्वांनी सुरु केलेले कर्तव्य आजही अविरत सुरुच आहे. औंध क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे डॉ. स्वाती बढिये यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

 

येथील सर्व डॉक्टर, कर्मचा-यांनी प्रत्येक रुग्णाला योग्य ती सेवा देत आपली जबाबदारी पार पाडली आहे. आपल्या समस्यांचा कुठलाही बाऊ न करता प्रत्येकाने स्वतःला कामात वाहून घेतले आहे. जवळपास तीन महिन्यात सर्वांनी केलेल्या कामाच्या बळावर रुग्णांना योग्य सेवा देत त्यांना बरे करण्यात यशस्वी ठरल्याने सर्व कर्मचा-यांचा मला सार्थ अभिमान आहे.

-डॉ. स्वाती बढिये, वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT