corona.jpg
corona.jpg 
पुणे

पुरंदरला कोरोनाचा सातवा मृत्यू; आता मात्र... 

श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुरंदर तालुक्यात कोरोनातून आज सातवा मृत्यू भिवडी गावच्या इसमाचा झाला. तो पुण्यात उपचारार्थ दाखल होता व मृत्यूनंतर रिपोर्ट पाॅझीटिव्ह आला. तालुक्यात आज तब्बल 19 रुग्ण कोरोना पाॅझीटिव्ह निष्पन्न झाले. त्यातून आज तालुका द्विशतक पार करून 215 वर पोचला.

तालुक्यातील कोरोनाबाधीत गावे 30 वर पोचून ग्रामीणमध्येही धाकधूक वाढली आहे. सासवडमध्ये आज 10  ने रुग्ण वाढून एकुण रुग्ण 126 झाले. सासवडला एका रुग्णालयात कोरोना योध्दाच पाॅझीटिव्ह सापडल्याने यंत्रणेची धावपळ वाढली. दरम्यान आमदार संजय जगताप यांनी स्वतः शहरात फिरुन आढावा घेत सूचना केल्या.

दरम्यान आमदार संजय जगताप व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी.. सासवड शहरातील लाॅकडाऊन शिथील न करता; मंगळवार (ता. 14) पर्यंत सुरु राहिल; असे जाहीर केले. त्यातून बाजारपेठ पूर्णतः बंदच आहे. शहरात बर्‍यापैकी शुकशुकाट दिसून आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आज सासवडसह सोनोरी, उदाचीवाडी, परिंचे, तोंडल, भिवडी गावात रुग्ण वाढलेत. त्यातून तालुक्यात 30 गावात कोरोनाचा शिरकाव होताना..  पंचवीसवरुन चाळीसच्या पुढे कंटेन्मेंट झोन गेले आहेत. सासवडला आज जे पाॅझीटिव्ह रुग्ण आढळून आले; त्यात रुग्णालयातील एक कोरोना योध्दा व इतरत्रची तीन अल्पवयीन मुले आहेत.

सासवड शहर 126 रुग्ण संख्या वगळता ग्रामीणचे रुग्ण 87 झालेत. त्यातील ग्रामीणचे 50 रुग्ण या दहा दिवसातील आहेत. म्हणजेच शहराबरोबर ग्रामीणमध्येही बाधा वाढत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT