पुणे

मद्यपी चालकांवर आता ‘कोर्ट केस’

चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर - मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनो सावधान...आता केवळ दंड भरून सोडले जाणार नाही. रस्त्यावरील वाढते अपघात पाहता पोलिसांनी आता गुन्हा नोंदविण्यास सुरवात केली आहे. गेल्या वीस दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी १८६ दारूड्या वाहन चालकांना पकडून न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे आता दंडात्मक कारवाई करून सोडले जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक शाखा व जिल्ह्यातील ३१ ठाण्यामधून १ ते १० ऑक्‍टोबरपर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध मार्गावर वाहनांची तपासणी केली. यात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची सरकारी दवाखान्यात तपासणी करून थेट गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. ठराविक वेळेतील अपघात टळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोहीम पुढे कायम ठेवण्यात आलेली आहे. विशेषतः महामार्गालगतच्या हद्दीत मद्यपींवर कारवाईचे सत्र कडक स्वरूपाचे असेल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

एक ते २१ ऑक्‍टोबरपर्यंत जिल्ह्यात १८६ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. न्यायालयाने ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याला दिवसाला ‘टार्गेट’ दिल्याने मद्यपी शोधायला पथकच असते. वेळ, काळही ठराविक नाही. दारू पिऊन वाहन चालविणारा दिसताच गुन्हा नोंदविला जातो. पहिल्यांदा दंडाची रक्कम कमी स्वरूपात असली तरी संबंधित चालक वारंवार आढळल्यास वाहन चालविण्याचा परवाना निलंबित व शिक्षा होऊ शकते. 

अपघाताचे प्रमुख कारण मद्यपान करून वाहन चालविणे हेच आहे. कागदपत्रे अपुरी असल्यास दंड आकारून सोडण्यात येते. पण, मद्यपी चालकांमुळे इतरांच्या जिवाला धोका होतो, ही बाब लक्षात घेऊन तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. 
-अरुण मोरे, वाहतूक शाखा प्रमुख (पोलिस निरीक्षक), जिल्हा पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT