court rejected wife s application to live with her husband family dispute pune
court rejected wife s application to live with her husband family dispute pune sakal
पुणे

Pune : विभक्त पत्नीचा पतीसोबत राहण्यासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक वाद सुरू असल्याने वेगवेगळ्या राहत असलेल्या जोडप्यातील पत्नीने पुन्हा पतीसोबत त्याच्या घरात राहण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. पती-पत्नी यांना एका घरात राहण्याबाबत आदेश दिल्यास त्यांच्यात वादविवाद होऊन नवीन तक्रारी दाखल होतील, असे म्हणणे पतीकडून न्यायालयात सादर करण्यात आले होते.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगांवकर यांनी हा आदेश दिला. दीप्ती आणि राहुल (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. या जोडप्यात किरकोळ कारणांवरून वाद होऊ लागल्याने पत्नीने २०१७ मध्ये पतीचे घर सोडले.

त्यानंतर ती मुलीला घेऊन आई -वडिलांकडे माहेरी राहायला गेली. पत्नीला कंटाळून पतीने २०१७ मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. दरम्यान पत्नीने देखील २०१७ मध्ये पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत फिर्याद दिली. दोन्ही प्रकरणात पतीने पत्नी व मुलीला पोटगी देण्याचा आदेश दिलेला आहे.

कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पत्नीने माहेरची जागा अपुरी पडत असल्याने पतीने त्याच्या राहत्या घरात राहण्यास जागा द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज २०२२ मध्ये दाखल केला होता.

या अर्जाबाबत राहुल यांनी त्यांचे वकील ॲड. अमित राठी यांच्यामार्फत म्हणणे मांडले की, घटस्फोटाचा दावा अद्याप प्रलंबित आहे. पती-पत्नी एकत्र आल्यास घटस्फोटाच्या दाव्याचे मूळ कारण संपुष्टात येईल. तसेच पती-पत्नी २०१७ पासून विभक्त राहात आहेत. त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.

त्यामुळे जर आता पती पत्नी यांना एका घरात राहण्याबाबत आदेश दिल्यास त्यांच्यात वादविवाद होऊन नवीन तक्रारी दाखल होतील. या परिस्थिती मुलीच्या मनात संभ्रम निर्माण होईल. ॲड राठी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पत्नीचा अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात पतीच्या वतीने ॲड अमित राठी आणि ॲड अविनाश पवार यांनी काम पहिले. न्यायालयीन कामात त्यांना ॲड. पूनम मावाणी आणि ॲड. प्राची जोग यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT