Cracker-Sound
Cracker-Sound 
पुणे

यंदा फटाक्यांचा ‘आव्वाज’ दबला

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात दिवाळीमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दोन टक्‍क्‍यांनी घट झाली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार पिंपरीतील डीलक्‍स चौकात प्रदूषणाने सकाळी सर्वांत जास्त पातळी ओलांडली. तर सायंकाळच्या वेळेत थेरगावातील डांगे चौकात सर्वाधिक पातळी वाढली. भाऊबीजेला डीलक्‍स चौकात सायंकाळी सर्वाधिक घट होती.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डीलक्‍स चौक, डांगे चौक व चिंचवडमधील चापेकर चौक या ठिकाणी पाहणी करून प्रदूषणाचे निष्कर्ष काढले आहेत. लक्ष्मीपूजन, नरकचतुर्दशी व भाऊबीज या दिवशी मंडळाने प्रदूषणाची २४  तास पाहणी करून नोंदी घेतल्या आहेत. दिवाळीमध्ये सकाळी ६ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशा दोन टप्प्यात निरीक्षण करून अहवाल दिला आहे.  

डीलक्‍स चौकात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषण पातळी ८३.९ डेसिबल एवढी ओलांडली होती. तर त्याच दिवशी डांगे चौकातही सर्वाधिक पातळी ७०.९ डेसिबल इतकी होती. पावसामुळे फटाक्‍यांच्या आतषबाजीत यंदा घट होऊन पर्यावरणाची हानी कमी झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले.

यंदा प्रदूषणाच्या पातळीत किंचित घट झाली आहे. प्रदूषण कमी करण्यात यावर्षी काही अंशी यश आले आहे. प्रदूषण नोंदवलेल्या भागात वाहनांची वर्दळही असते. औद्योगिक, रहिवासी व व्यावसायिक क्षेत्रात दरवर्षी पाहणी करून आम्ही प्रदूषणाचा स्थिर आकडा नोंदवून घेतो. 
- किरण हसबनीस, उपप्रादेशिक  अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT