Pune News : वानवडीतील आझादनगरमधील ज्येष्ठ दांपत्य तारा दीपक राय. तारा राय गृहिणी तर, पती दीपक राय सैन्यदलातून नाईक पदावरून निवृत्त झाले आहेत. रविवारी, १० मार्चला दुपारी चारच्या सुमारास राय दांपत्य मुंढव्यातील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. सायंकाळी सहाला ते घरी परतले.
त्यावेळी त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाट उघडेच. तिजोरीत पाहिले असता त्यांना धक्काच बसला. ‘‘सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे २८ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता.
आयुष्यभर कष्ट करून नातींच्या लग्नासाठी दागदागिने जमा केले होते. परंतु चोरट्यांनी सर्व दागिने, पैसे चोरून नेले. आता काहीच शिल्लक राहिले नाही,’’ हे सांगताना तारा राय यांना अश्रू आवरत नव्हते.
वानवडी परिसरातच सात मार्चला आलिम शेख यांच्या दुकानातून दुपारी चोरट्यांनी ४६ हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल चोरून नेले. स्वारगेट परिसरात सॅलिसबरी पार्कमधील सत्यदेव तिवारींच्या दुकानातून २८ जानेवारीला पहाटे चोरट्यांनी ४३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रूकमधील सदनिकेतून ९ मार्च रोजी चोरट्यांनी ६२ हजारांचे दागिने लांबवले. २८ फेब्रुवारीला दुपारी लोणीकंद परिसरात केसनंदमधील महिलेच्या घरातून एलसीडी, टिव्हीसह इतर साहित्य चोरीस गेले. हडपसर मांजरी येथील गोडावूनमधून आठ मार्चला चोरट्यांनी सव्वालाख रुपयांचा माल चोरून नेला.
गेल्या वर्षभरात २०२३ मध्ये शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे २५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीस गेला. कोणाच्या घरातून हजारोंचा तर कोणाच्या घरातून, दुकानातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला जात आहे. लोक दिवस-रात्र कष्ट करून पैसा जमा करतात.
दागदागिने घेतात. परंतु चोरटे रेकी करून भरदिवसा आणि रात्री घरफोडी करून दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. शहराच्या मध्य भागातच नव्हे तर लगतच्या उपनगरांमध्येही घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्या शहर पोलिस दलात बहुतांश अधिकारी बदलून नव्याने आले आहेत. तर काहीजण केवळ बदल्यांच्या चिंतेत आहेत. त्यांना सध्या घरफोडीच्या घटनांबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही.
कष्टाने जमा केलेले सगळे दागिने, पैसा चोरीस गेले. पोलिसांनी आमचे दागिने परत मिळवून द्यावेत. घरफोडीच्या घटना होऊ नयेत, याकडे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. सराफ व्यापाऱ्यांनीही कोणी चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन आल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
- तारा दीपक राय, गृहिणी, वानवडी.
घरफोडी करण्याची पध्दत (मोडस)
कडी कोयंडा उचकटून १९९
कुलूप तोडून २१७
शटर उचकटून ६८
खिडकीचे गज कापून ४८
गच्चीतून, छतावरून - १४
बनावट चावीने ५४
वर्ष २०२४ जानेवारी, फेब्रुवारीअखेर - ७९
घरफोडी करण्याची पध्दत (मोडस)
कडी कोयंडा उचकटून २४
कुलूप तोडून ३८
शटर उचकटून ११
खिडकीचे गज कापून ४
इतर- २
(वर्ष २०२३ आणि २०२४ फेब्रुवारीअखेर)
घरातून चोरी- ४५२
दुकानातून चोरी- १५०
कंपनी, गोडावूनमधून- ३१
मंदिर, शाळा, लॉज - १७
खासगी कार्यालयातून- २९
वर्ष- दाखल गुन्हे- उघडकीस- चोरीस गेलेला मुद्देमाल (रुपयांत) -मिळालेला मुद्देमाल- अटक आरोपी
२०२२- ५९२- २५३- १६ कोटी २८ लाख २३ हजार - ५ कोटी ३६ लाख - ४५७
२०२३- ६००- २९३- २४ कोटी ७५ लाख ४६ हजार - २ कोटी ९५ लाख - ५०७
२०२४ जानेवारीअखेर- ३९- ७- ५३ लाख ३० हजार- ७ लाख २१ हजार- १३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.