Crime-Scene
Crime-Scene 
पुणे

नागरिकांच्या मारहाणीत गुन्हेगाराचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - गाड्यांची तोडफोड, घरांवर दगडफेक करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास संतप्त नागरिकांनी केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. महंमदवाडी येथील तरवडेवस्तीत शनिवारी सायंकाळी साडेसात ते रात्री दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून; एकाला अटक केली आहे.

अक्षय बाळासाहेब सोनवणे (वय २१, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षयचे वडील बाळासाहेब सोनवणे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मधुकर थोरात (रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर) यास अटक करण्यात आली आहे.

वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सयाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीची तोडफोड केल्याच्या कारणावरून अक्षय याचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी भांडण झाले होते. याबाबत संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग आल्याने अक्षयने या महिलेच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे महिलेचा पती मधुकर थोरात व त्याच्या तीन साथीदारांनी पळून जाणाऱ्या अक्षयचा पाठलाग करून त्यास काठ्या व लोखंडी गजाने मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अक्षयला पोलिसांनी उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

या प्रकरणाचा तपास गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक रावसाहेब भापकर करत आहेत. अक्षयवर घरफोडी, वाहनचोरी व खुनाचा प्रयत्न या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT