Crop-Loan
Crop-Loan sakal
पुणे

पुणे : जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक कर्ज वाटप करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जिल्ह्यात तीन हजार ८९२ कोटी ४० लाख रुपये कर्ज वाटप झाले असून, त्याचा तीन लाख ७७ हजार ४१० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेत बँकांशी संपर्क साधत कर्जवाटपातील अडचणी दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापूर्वी २०१५-१६ साली तीन हजार ५०६ कोटी ६१ लाख रुपये कर्ज वाटप झाले होते. त्यापेक्षा ३८५ कोटी ७९ लाख रुपये अधिक पीक कर्जवाटप यावर्षी झाले आहे. यावर्षी तीन हजार ८८२ कोटी रुपये एवढे उद्दिष्ट असताना त्यापेक्षा १० कोटी ४० लाख रुपये अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जून महिन्यापासून सर्व बँकांकडे पाठपुरावा करण्यात आला. खरीप हंगामामध्ये दोन हजार ७५८ कोटी ८२ लाख रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा १८१ कोटी ८० लाख रुपयांनी कमी कर्जवाटप झाले होते. ही तफावत रब्बी हंगामातील कर्जवाटपाद्वारे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी वेळोवेळी पीक कर्जाचा आढावा घेतला. सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. या सर्व प्रक्रियेत बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनीही मोलाची भूमिका बजावली आहे.

जिल्हा बँकेकडून दोन हजार ३३३ कोटींचे पीककर्ज

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १०४ टक्के कर्ज वाटप करून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ओलांडले. खासगी क्षेत्रातील बँकांनी ९९.८१ टक्के कर्ज वाटप केले. तसेच, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार ३३३ कोटी ५५ लाख रुपये कर्ज वाटप करून मोठी भूमिका बजावली आहे. बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शाखांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४८.०७ टक्के कर्ज वाटप केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT