lenyadri
lenyadri 
पुणे

संकष्टीचतुर्थी निमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर

जुन्नर - संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे आज शनिवार ता.27 रोजी भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात 12 ते 15 हजार भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. 

देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते पहाटे श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. 

श्री गिरिजात्मजकाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी व दुपारी महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी मोठया संख्येने भाविक मंदिरात उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT