पुणे

'सीआरपीएफ'च्या उमेदवारांची हेळसांड 

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन (पुणे) : केंद्रीय राखीव पोलिस दलामधील (सीआरपीएफ) भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची वर्षानुवर्षे निवाऱ्याअभावी हेळसांड सुरू आहे. सीआरपीएफ प्रशासन त्याबाबतची जबाबदारी झटकत असल्याने आता स्वयंसेवी संस्था, संघटना व दानशूरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सध्या (13 ते 25 ऑगस्ट) सीआरपीएफमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. पहाटे पाच वाजता भरतीसाठी हजर व्हावे लागत असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवार आदल्या दिवशीच येथे येतात. हे केंद्र पुणे-मुंबई महामार्गालगत असल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना निवारा मिळत नाही. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हॉटेल अथवा लॉजवर राहणे परवडत नाही. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी, मंदिर, सभागृह अशा मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतात. अनेक स्थानिक नागरिक प्रतिव्यक्ती पैसे घेऊन त्यांना तात्पुरती व्यवस्था करून घेतात; तर अशा भरतीच्या काळात हॉटेल-लॉज व्यावसायिक खोल्यांचे दर वाढवितात. 

सीआरपीएफ प्रशासन त्यांची कोणतीही जबाबदारी घेत नसल्याने बहुतांश उमेदवार केंद्राबाहेर महामार्गालगत उघड्यावर राहतात. त्यातून परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होते. त्यानंतर स्थानिकांनाच साफसफाई करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. 

सीआरपीएफकडून दुर्लक्ष 
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या निवाऱ्याची तात्पुरती सोय करावी, असे आवाहन स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकदा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना केले आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावाही केला आहे. मात्र, केंद्राकडून दाद मिळत नाही. 

सामाजिक बांधिलकीची अपेक्षा 
केंद्रालगतची मंगल कार्यालये, मंदिर व्यवस्थापनांनी सामाजिक बांधिलकीतून या उमेदवारांना तात्पुरता निवारा दिल्यास त्यांची परवड थांबेल, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 
याबाबत उमराळी देवी मंदिराचे विश्‍वस्त अरुण म्हाळसकर म्हणाले, ""गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अशा उमेदवारांना मंदिराच्या सभामंडपात आश्रय देतो. किंबहुना, त्यानंतरही साफसफाईही आम्हाला करावी लागते.'' 

भरतीसाठी आलेला जीवन पोतेकर हा उमेदवार म्हणाला, ""सीआरपीएफकडून कोणतीही सोय होत नाही. त्यामुळे आमची परवड होते. देशाच्या संरक्षणासाठी भरती होणाऱ्या भावी जवानांना अशी वागणूक देणे खेदजनक आहे.'' 


कर्मचारी निवड आयोग आणि गोपनीयता कायद्याच्या बंधनांमुळे उमेदवारांच्या निवासाची सोय केंद्रात करणे शक्‍य नाही. भरती चाचणीदरम्यान आलेल्या उमेदवारांना पुरेशा सुविधा दिल्या जातात. 
- संतोष भोसले, सहायक कमांडंट, सीआरपीएफ, तळेगाव दाभाडे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT