dada.jpg
dada.jpg 
पुणे

बारामतीत अजित पवारांविरुद्ध कोण... याची उत्सुकता

मिलिंद संगई

बारामती शहर : विधानसभा निवडणूकीची प्रक्रीया सुरु हाेऊनही तीन दिवस उलटूनही बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण काही दिसत नाही. 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा भर असेल असे सध्याचे चित्र आहे.

बारामतीत एरवी निवडणूक म्हटली की जो एक फीवर दिसतो, त्याचा लवलेशही शहरात दिसत नाही. अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी आज बाहेर पडून स्थिरस्थावर झाली आहे. तर दुसरीकडे भाजप की शिवसेना नेमके कोण निवडणूक लढविणार हे चित्र अजूनही स्पष्ट नाही.

बारामतीत राष्ट्रवादीकडून अजित पवार हेच उमेदवार असतील हे निश्चित आहे, मात्र विरोधी पक्षांकडून ही जागा कोण लढविणार या बाबत कोणीच ठामपणे काहीच सांगू शकत नाही. शिवसेनेकडून जागा लढायची ठरली तर अँड. राजेंद्र काळे, भाजपकडून लढायचे ठरले तर बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे या तीन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. 

युतीबाबत निर्णय होत नसल्याने भाजप व सेना कार्यकर्त्यातही कमालीची अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसात प्रचार कसा करायचा हाच प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यातही राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असल्याने अजित पवार यांच्याविरोधात इतक्या कमी काळात प्रचार कसा करायचा हे आव्हानही उमेदवाराला पेलावे लागेल. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केलेले असले तरी त्यांच्ये राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केलेला आहे, मात्र ही विधानसभा नव्हे तर 2024 ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे असे सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार या कडे सर्वांचेच लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती या कामाची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारिख निश्चित नसली तरी येत्या दोन दिवसात ही तारिख निश्चित होईल, असे ते म्हणाले. 

काय आहे बारामतीची पार्श्वभूमी....
सन 1991 पासून या मतदारसंघातून अजित पवार हेच सातत्याने विजयी झाले आहेत. हनुमंत कोकरे, रतन काकडे, चंद्रराव तावरे, पोपटराव तुपे, रंजन तावरे, बाळासाहेब गावडे अशा अनेकांनी नशीब आजमावून पाहिले मात्र बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना पराभूत करणे कोणालाच शक्य झाले नाही. मोदी लाट असताना व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही अजित पवारांच्या मताधिक्यात काही फरक पडला नाही.  यंदा आता कोण अजित पवारांविरुध्द उभे ठाकणार या बाबत बारामतीत उत्सुकतेचे वातावरण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT