Cycle-Distribution
Cycle-Distribution 
पुणे

मावळातील विद्यार्थ्यांसाठी ‘रिसायकल’

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - ऊन-पावसाची तमा न बाळगता डोंगर व नदी-नाल्यांतून मार्ग काढत शाळेत जाणाऱ्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीच्या माध्यमातून मावळात तीन वर्षांपासून सायकलदानाची मोहीम राबविली जात आहे. 

गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकलदानाची ‘रिसायकल’ ही मोहीम राबविण्यात येत असून, जुन्या व वापरात नसलेल्या सायकल दुरुस्त केल्या जातात. त्यासाठी सोशल मिडीयावरून आवाहन केले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुरेशा साधनांअभावी दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही मोहीम सुरू केल्याची माहिती सायकलदान चळवळीचे मुख्य प्रवर्तक तसेच रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, दीपक फल्ले आणि केशव मोहोळ यांनी दिली. 

गेल्या दोन वर्षांत सुमारे दोनशे जुन्या-नव्या सायकली वितरित केल्या असून, यंदा किमान १०० सायकलींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी दुरुस्त होणाऱ्या अथवा नवीन सायकल दान करता येतील. 

या अभियानासाठी रोटरॅक्‍ट क्‍लबतर्फे आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायकलदान हे अभियान वर्षभर सुरू असते.

रोटरी सिटीचा तिसरा ‘सायकल डे’
रविवारी (ता. १०) रोटरी सिटीने तळेगावात आयोजित तिसऱ्या ‘सायकल डे’ला चांगला प्रतिसाद मिळाला. गरजूंना दहा सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आठशेहून अधिक विद्यार्थी व नागरिक रॅलीत सहभागी झाले. या वेळी आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, संग्राम काकडे, रश्‍मी कुलकर्णी, शांताराम कदम उपस्थित होते. तीन विद्यार्थ्यांना लकी ड्रॉद्वारे सायकल वाटप केल्या. विलास काळोखे, केशव मोहोळ, मनोज ढमाले, संतोष शेळके, दीपक फल्ले, शरयू देवळे आदींनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT