cycle-photo
cycle-photo 
पुणे

पर्यावरणपूरक सायकलला मावळात पुन्हा सुगीचे दिवस

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन (पुणे): वाहनांमुळे होणारी प्रदूषणवाढ नियंत्रणात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक, आरोग्यावर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागातही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल मावळात सुसाट आहे.

आधुनिकतेच्या जमान्यात वेगवान बाईक्सकडे तरुणाईचा ओढा दिसत असला तरी बालक, पालक आणि जेष्ठ मंडळींची पावले मात्र पुन्हा सायकलकडे वळू लागली आहेत. जवळपास दोन दशके अडगळीला गेलेल्या सायकलची चाके शहराबरोबरच ग्रामीण भागातही पुन्हा वेग धरु लागली आहेत. पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले दर आणि दम कोंडविणारी वाहतूक कोंडी विचारात घेता विनाइंधन या अर्थाने स्थानिक वापरासाठीचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणून सायकलचा ट्रेंड रुजू पाहत आहे.

एरव्ही गरिबीचे लक्षण मानले गेलेलया सायकलकडे आजमितीला श्रीमंतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. केवळ प्रवासाचे साधन म्हणूनच नव्हे तर व्यायाम आणि इंधनबचतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपासून ते युवक, युवती, महिला आणि जेष्ठ मंडळीदेखील सायकलची रपेट मारताना नजरेस पडतात. सायकल डे, सायकल मॅरेथॉन, सायकल वाटप, सायकल बँक आदी उपक्रमांची रेलचेल आणि नागरिकांचा सहभाग देखील दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वैविध्यपूर्ण प्रयोगांमुळे सायकल क्षेत्रातही नवनवीन कल्पना आणि रचनांचे वारे वाहू लागले असून जुन्या रटाळ सांगाड्याचा लूक काळानुरुप बदलत आहे. जाड टायर, अगदी सडपातळ टायर, गियर, बॅटरी, डायनामो आणि तत्सम विविध सुविधायुक्त सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत. 

क्रेझमुळे सायकलला मागणी वाढत चालली असली तरी त्याप्रमाणात काही मॉंडेल्सची उपलब्धता मात्र कमी असल्याने सायकल खरेदीसाठीही कधीकधी प्रतीक्षा करण्याची वेळ ग्राहकांवर येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दुचाकींनाही तोडीस तोड देईल असा सायकलच्या दुकानांचा देखील चेहरा मोहरा बदलत आहे.तळेगावमध्ये लक्ष्मी सायकल्सने अगदी शोरुमला साजेसे दुकान नूतनीकरण केल्याने साहजिकच ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. वापर वाढत चालल्याने विक्रेत्यांबरोबरच सायकल रिपेअरिंग,पंक्चर व्यावसायिकांनाही धंद्यात तेजी जाणवत आहे.

गेल्या दोन वर्षांत महिन्याकाठी विकल्या जाणाऱ्या ३०-३५ छोट्या मोठ्या सायकलींची संख्या आजमितीला ७५च्या वर गेली असून, उलाढाल जवळपास दुपटीने वाढून ५ लाखांच्या वर पोहोचली आहे. तळेगावमध्ये ३ हजारापासून ते पंचवीस हजार रुपये किमतीपर्यंतच्या सायकली उपलब्ध असून, ट्रेंडनुसार सायकल्सच्या नवनवीन मॉडेलची मागणी ग्राहकांकडून वाढत आहे, असे लक्ष्मी सायकल्सचे सुभाष करपे यांनी सांगितले. 

सुनिल शेळके यांच्या स्व. गोपीनाथ मुंडे सोशल फौडेंशनने गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवळपास ७०० सायकलींची मावळातील विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने वाटप केले.

रोटरॅक्ट क्लबच्या वतीने जुन्या सायकली दुरुस्ती करून पुन्हा वापरायला सुरुवात केली आहे.रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी गेल्या दोन वर्षांपासून सायकल डे आयोजित करत असून गेल्या वर्षभरात १०० सायकलींचे वाटप करण्यात आले असल्याचे संस्थापक विलास काळोखे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची चणचण लक्षात घेता, पर्यावरणपुरक सायकल वापर वाढीसाठी तळेगाव दाभाडे नगरपालिका प्रशासन,जागेच्या उपलब्धतेनुसार सायकल पार्किंग लाॅट आणि स्वतंत्र सायकल वे विकसीत करु शकेल, असे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.

सायकलींगचा अनुभव खरोखरच अप्रतिम आहे. दैनंदिन जीवनात चैतन्य भरण्याचे काम सायकलिंगमुळे होते. तळेगाव हे स्वच्छ सुंदर पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहे.ते अबाधित ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सायकल वापरुन पुढच्या पिढीला प्रदूषणमुक्त हवा देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे, असे आंतरराष्ट्रीय सायकलपटु दिपक फल्ले यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT