baramati
baramati 
पुणे

दत्तात्रय चौधर राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर

मिलिंद संगई

बारामती शहर - येथील भिगवण पोलिस ठाण्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात सेवेत असलेले सहायक पोलिस फौजदार दत्तात्रय तुळशीराम चौधर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले आहे. 

राष्ट्रपतींचे पोलिस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हे पदक त्यांना जाहिर झाले आहे. गेल्या 33 वर्षांपासून पोलिस दलातील सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करुन त्यांना हे पदक जाहिर झाले आहे. 

दत्तात्रय चौधर हे 1986 ते 1992 या कालावधीत मुंबई पोलिस दलात, 1992 ते 2002 पर्यंत पुणे शहर पोलिस दलात आणि त्यानंतर आजतागायत पुणे ग्रामिण पोलिस दलात कार्यरत आहेत. या सेवाकाळात त्यांना विविध पातळ्यांवर केलेल्या कामगिरीबद्दल 320 पारितोषिके मिळाली आहेत. या काळात त्यांनी 91 गुन्ह्यातील 60 आरोपी धाडसी छापे मारुन पकडले. या शिवाय 86 गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. या गुन्ह्यांमधील 15 लाखांचा माल त्यांनी परत मिळविला. 

पुणे शहर पोलिस दलात असताना 25 मोटारसायकलींचा शिताफीने लावलेला शोध, बँकेत पैसे भरण्यास आलेल्या फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून बॅग हिसकावून नेणा-या आरोपीस 24 तासात जेरबंद केले. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासात गजाआड केले. खूनाच्या गुन्ह्यात 14 वर्षे फरारी असलेल्या आरोपीस पकडले. अशा अनेक क्लिष्ट प्रकरणांची उकल चौधर यांनी केली आहे. 

अनेकदा जिवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल दोन वर्षांपूर्वी त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्हही प्राप्त झाले आहे. विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी चौधर यांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT