पुणे

दौंडमध्ये ८०५ लिटर गावठी दारू जप्त

CD

दौंड, ता. २२ : दौंड शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर एका वाहनातील एक लाख रुपये मूल्य असलेली ८०५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. दौंड पोलिसांनी गस्तीदरम्यान ही कारवाई केली
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, रविवारी (ता. २२) मध्यरात्री दोन वाजता नगर मोरी येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरून जाणारा एक टेम्पो काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथून दौंड मार्गे रेल्वे उड्डाण पुलाच्या दिशेने संशयास्पदरीत्या जात होता. गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक रमेश साळुंके व गृहरक्षक दलाचे जवान अतुल कुतवळ यांनी टेम्पो थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये गावठी दारूचे कॅन आढळून आले. २३ कॅनमध्ये एकूण ८०५ लिटर गावठी दारू आढळून आली.
दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी उपनिरीक्षक रमेश साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालक यलगुंड महादेव दोडमणी (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हवालदार अमीर शेख पुढील तपास करीत आहेत. जप्त केलेल्या दारूचे मूल्य १ लाख ६२५ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी गावठी दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अडीच लाख रुपये मूल्य असलेला टेम्पो जप्त केला.
शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ ४ फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ३९ लाख रुपये मूल्य असलेला प्रतिबंधित मद्यसाठा जप्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT