Pune Crime News
Pune Crime News  sakal
पुणे

Pune Crime News : बारामतीत पती-पत्नीचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात...

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरातील जामदार रोडवरील खत्री पवार इस्टेटनजीक पती-पत्नीचा मृतदेह आज रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर बारामतीत खळबळ माजली. सचिन महालिंग वाघोलीकर व सारिका सचिन वाघोलीकर असे या पती-पत्नीचे नाव असून या दोघांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक घरात आढळून आला. दोघांच्याही अंगावर वार असल्याचे पोलिसांनी सांगितले

सचिन यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी नेहमीप्रमाणे आज सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत पोलीस तपास करीत आहेत. वाघोलीकर दांपत्यास दोन मुले व एक मुलगी असून ते तिघेही घटना घडली त्यावेळेस घरात नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT