chhatrapati sambhaji maharaj statue sakal
पुणे

Pune News : डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मेघडंबरी

डेक्कन जिमखाना येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर मेघडंबरी उभारण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - डेक्कन जिमखाना येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. यासाठी ४७ लाख २७ हजार रुपयांचा खर्च येणार असून, या निविदेस महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

संभाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या वर मेघडंबरी उभारण्यात यावी, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा पाहणी करून त्याचा प्रस्ताव तयार केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भोवती चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यावर पॉलिस्टर रेझिनचा वापर करून आकर्षक मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहता यावे यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे.

या ठिकाणी दगडी बांधकामामध्ये सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी भवन विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यात तीन निविदा आल्या. त्यापैकी पूर्वगणनपत्रकाच्या रकमेपेक्षा साडेपाच टक्के कमी दराने आलेल्या सर्वात कमी दराच्या निविदेला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

कार्यकारी अभियंता वीरेंद्र केळकर म्हणाले, या कामात मेघडंबरीसह, जिने व चौथऱ्याच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी ४७ लाख २७ हजार खर्च येणार आहे. कामाची मुदत तीन महिन्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT