Deendayal Upadhyay employment Gathering for the unemployment on Tuesday 28 june 2022 Organized District Skill Development Centers pune  sakal
पुणे

पुणे : येत्या मंगळवारी बेरोजगारांसाठी दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास केंद्रांमार्फत आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एस.एन.डी.टी.) गृहविज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी येत्या मंगळवारी (ता. २८) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा कर्वे रोड येथील जेडीबीआयएमएसआर (एमबीए इमारत), एस.एन.डी.टी. महाविद्यालय, महर्षी कर्वे विद्याविहार, पुणे येथे होणार असल्याचे पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी गुरुवारी (ता.२३) सांगितले.

या मेळाव्यात बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे शहर, भोसरी व पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण २५ कंपन्या सहभागी होणार आहेत. या सर्व कंपन्यांकडे मिळून विविध पदांच्या एकूण ४ हजार ८८३ जागा रिक्त आहेत. या सर्व रिक्त जागांसाठी किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीबीए, एमबीए, वित्त, मार्केटिंग, बी. एस्सी., एम. एस्सी., अन्न प्रक्रिया, बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, पीजीडीएम, पीजीडीएचएम, डिजिटल मार्केटिंग, बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएम आदी विविध पात्रताधारक बेरोजगार युवक पात्र असणार आहेत.

मेळाव्यात सहभागासाठी हे करा

शहर व जिल्ह्यातील बेरोजगार युवतींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदविणे आवश्‍यक आहे. शिवाय मुलाखतीला बेरोजगारांनी आपापली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणणे अनिवार्य असल्याचे उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT