takli-haji
takli-haji 
पुणे

शेतकऱ्यांसाठी अधिक भाव देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखान्याच्या माध्यमातून घेतलेले कर्ज किती दिवसात फेडणार या बाबत शंका व्यक्त करत भिमाशंकर व घोडगंगा सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक भाव देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली. जांबूत (ता. शिरूर) येथे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पोपटराव गावडे होते. 

पवार म्हणाले की, तालुक्यात दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ऊस उत्पादक शेतकरी हुमणी रोगाने ग्रासला असून या वर्षी उसाचे उत्पादन घटणारे आहे. घोड व कुकडी या नदीला पाणी सोडल्याने या परीसरातील शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादनाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील काळात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने 60 कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आत्ता पर्यंतचा कालावधी घेतला. यानंतर घोडगंगेने सव्वाशे कोटी रूपयांचे कर्ज घेतले असून ते फेडण्यासाठी किती वर्ष लागतील या बाबत शंका निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले अधिका अधिक उसाचे उत्पादन हे फायदेशिर ठरणारे आहे. तालुक्यात पराग व व्यंकटेश खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाची तोडणी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर उसाची तोडणी करण्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

घोडंगंगेचे माजी उपाध्यक्ष बोलले... 
घोडगंगा कारखान्याने घेतलेले कर्ज कधी फेडले जाईल याबाबत शंका असल्याने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांना उपाध्यक्ष केले नाही. उपाध्यक्ष म्हणून काही काळ या कारखान्यावर काम केले असल्याने कारखान्यावरील कर्जाची माहिती आहे. ही माहिती खरी असली तरी पत्रकारांनी हा खाजगी चा विषय असल्याने मनावर घेऊ नये. असे सांगत शेतकऱ्यांच्या कारखान्यावर राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षातील फुट दिसून आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT