Dhananjay Munde speaks about Udayanraje Bhosale
Dhananjay Munde speaks about Udayanraje Bhosale  
पुणे

उदयनराजेंबाबत भाजपच्या गोटातूनच बातमी पसरवली : मुंडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांनी कधीच भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केलेले नाही. महाराष्ट्रातील प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजपच्या गोटातून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची बातमी पसरविण्यात आली, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.

उदयनराजे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. 12) त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी धनंजय मुंडे व शशिकांत शिंदे उपस्थित होते. उदयनराजेंचे मन वळविण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी माहिती दिली.

मुंडे म्हणाले, की आजची बैठक विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी होती. पक्षाची भूमिका काय असेल, यासाठी चर्चा झाली. पक्षाची भूमिका काय याबाबत सविस्तर चर्चा झाली.  भाजप प्रवेशाबाबत उदयनराजेंनी कधीच वक्तव केलेले नाही. महाराष्ट्रातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या गोटातून ही बातमी पसरविण्यात आली. उदयनराजेंच्या नाराजीबाबत विषयच नाही. शिवस्वराज्य यात्रेवेळी त्यांच्यामागे अनेक कामे होती. त्यामुळे त्यांना येता आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT