1reservation.jpg
1reservation.jpg 
पुणे

आरक्षणासाठी धनगर समाजाचा संघर्ष रथयात्रेचा एल्गार

रमेश वत्रे

केडगाव  जि.पुणे : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत (एस.टी.) समावेश असूनही त्याची अंमलबजावणी सरकारकडून होत नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाजाची 22 ऑक्टोबरपासून नागपूर ते पंढरपूर संघर्ष रथयात्रा काढण्यात येणार आहे. असा निर्णय चौफुला ( ता.दौंड, जि.पुणे ) येथे आयोजित चिंतन शिबिरात घेण्यात आला.  

आरक्षण अंमलबजावणीसाठी व समाजाचे प्रभावी संघटन करण्यासाठी सर्वपक्षीय धनगर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने पत्रकार परिषदेमध्ये संघर्ष रथ यात्रेची माहिती दिली. रथ यात्रेचे संयोजन करणारे राज्य समितीचे प्रतिनिधी बापूसाहेब हाटकर (मुंबई), संदीपान नरवटे (मराठवाडा), विठ्ठल मारनर ( उत्तर महाराष्ट्र ), पांडुरंग मेरगळ व अशोक चोरमले (पश्चिम महाराष्ट्र), राम मरगळे (कोकण), देवेंद्र उगे ( विदर्भ ) श्रावण वाकसे ( मुंबई ) उपस्थित होते. 

संघर्ष यात्रा 22 ऑक्टोबरला नागपूर येथून सुरू होईल. वाहनांमधून ही रथ यात्रा राज्यातील संपुर्ण जिल्ह्यांमधून जाईल. सात नोव्हेंबरला रथ यात्रा जेजूरी येथे पोहचेल. जेजूरी ते पंढरपूर पायी यात्रा निघून ती 17 नोव्हेंबरला पंढरपूर येथे पोहचेल. तेथे राज्यातील समाजाच्यावतीने बारामतीप्रमाणे आमरण उपोषण केले जाईल. एसटीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय उठायचे नसून समाजाने 17 नोव्हेंबरनंतर पंढरपूर येथे पाठिंब्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. 

 यावेळी पांडुरंग मेरगळ म्हणाले, ''आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी व्याकरणाचा घोळ घालत समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. टाटा कन्सल्टन्सीला संशोधनाचे काम देऊन युती सरकार वेळकाढूपणा करीत आहे. हे सरकार समाजासाठी एस.टी. समावेशाची प्रक्रीया राबवत आहे. परंतु  घटनाकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचा एस.टी. मध्ये समावेश केलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी सरकारने करावी अशी आमची मागणी आहे. सरकारने गेल्या चार वर्षात निर्णय न घेतल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संघर्ष यात्रा व आमरण उपोषण करावे लागत आहे. यावेळी तळोदा संस्थानचे अमरसिंह बारगळ, मोरेश्वर झिले, आनंद थोरात, अॅड. दौलत ठोंबरे, विजय गावडे, अॅड.जी.बी.गावडे, बाळासाहेब कोळेकर, विठ्ठल कोकरे, ललित बंडगर, बाळासाहेब गरदरे, बाळासाहेब तोंडेपाटील, राधाकिसन रौंधळे, डॅा.अभिमन्यू टकले, डॅा. प्रशांत शेंडगे, संगिता डोके, महेश नाईक आदी उपस्थित होते.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT