Kondhawe Dhawade News sakal
पुणे

Kondhawe Dhawade News : कोंढवे- धावडे येथे धर्मवीर बलिदान मास सुरू

धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोंढवे- धावडे येथे अखंड ४० दिवस नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे. धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे. त्यांची आज गुरुवारी सुरुवात झाली‌.

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोंढवे- धावडे येथे अखंड ४० दिवस नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे. धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे. त्यांची आज गुरुवारी सुरुवात झाली‌. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो. औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या‌ केली. शंभुराजांना ४० दिवस वेदना दिल्या. याची या‌ महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तूं पदार्थांचा त्याग केला जातो.

माघ वद्य पंचमी, गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ते फाल्गुन अमावस्या ८ एप्रिल २०२४ पर्यंत हा मास पाळला जाणार आहे. कोंढवे- धावडे येथील कोंढवेश्वर मंदिर येथे रोज सकाळी सात वाजता छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण केले जाणार आहे.

औरंगजेबाने छत्रपती ​शंभूराजांची ४० दिवस वेदनाकारक रित्या हत्या​ केली होती. म्हणून या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळतात. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. गादी एवजी जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. बलिदान मास ही समाजमन घडवणारी, प्रभावी अशी श्रद्धांजली वाहण्याची पद्धत आहे. शिवप्रेमींनी सर्व बांधवांना हे समजावून सांगावे. यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजक सुनीत लिंबोरे‌ यांनी केले आहे.

धर्मवीर बलिदान मास उभ्या हिन्दु समाजाला अंतरमुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. हा मास सर्वांनी सामाजिक पातळीवर, कुटुंब पातळीवर व व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे. हीच खरी श्रदांजली धर्मवीर संभाजी महाराजांना आहे.

-अशोक सरपाटील, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जून 2026

आजचे राशिभविष्य - 07 जून 2026

Taj Viral Video : ताजमहालच्या हौदात माकडांची धम्माल 'पूल पार्टी'! व्हिडिओ व्हायरल होताच पर्यटकांची गर्दी; अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT