घोडेगाव (ता. आंबेगाव) ः विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त राम ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.
घोडेगाव (ता. आंबेगाव) ः विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त राम ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.  
पुणे

घोडेगावला दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार (व्हिडिओ)

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे): "राजकारणापेक्षा समाजकारण जास्त हे ब्रीद आतापर्यंत सांभाळणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे माझ्या दृष्टीने जनतेचे खरे पांडुरंग आहेत. त्यांच्या रूपाने आंबेगाव तालुक्‍याला मिळालेली शिदोरी जपून वापरा,'' असे आवाहन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा व राम ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ढोक महाराज बोलत होते.

या वेळी सत्कारमूर्ती दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, राम ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक रामशेठ काळे, पूर्वा वळसे पाटील, पांडुरंग महाराज येवले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, अतुल बेनके, शैलेश मोहिते, सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, माजी सभापती कैलासबुवा काळे, सरपंच क्रांती गाढवे, पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष अक्षय काळे उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, "राम ग्रामीण पतसंस्थेने 25 वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांना मदत व मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून समजात वेगळे स्थान निर्माण केले आहे.''

रोहित पवार म्हणाले, "दिलीप वळसे पाटील सत्तेत असताना व सत्तेत नसतानाही समाजासाठीच काम करीत असतात. मात्र काही नेते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावोगावी हिंडून मतांचा जोगवा मागत असतात.''

पांडुरंग महाराज येवले, क्रांती गाढवे, कैलासबुवा काळे यांची भाषणे झाली. अक्षय काळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सतीश जाधव व गणेश काळे यांनी केले.

भीमाशंकर कडून एक कोटीचा निधी
आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून भीमाशंकर सहकारी साखऱ कारखान्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक कोटी रूपयांच्या निधीची तरतुद केली आहे. हा निधी पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा यासाठी खर्च केला जाणार आहे. यासाठी शासनाच्या निधीची वाट पहात थांबणार नसल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

'सकाळ' बद्दल कृतज्ञता
माळीण दुर्घटनेनंतर जमा झालेला एक कोटी रूपयांचा निधी घोडेगाव येथे वसतीगृह बांधण्यासाठी देवून 'सकाळ' वृत्तपत्र समुहाने चांगले काम केले. 'सकाळ' वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या दुरदृष्टी निर्णयामुळे येथील अद्यावत वसतीगृहात आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेतील याबददल त्यांनी 'सकाळ' विषयी जाहीर भाषणात कृतज्ञता व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT