dilip-publication
dilip-publication 
पुणे

'व्यक्तिचित्रण लेखन म्हणजे त्या व्यक्तिमत्वांचे सप्तरंगी आरेखन असते'

अक्षता पवार

पुणे - व्यक्तीचित्रण लिहणे ही तारेवरची कसरत असते. एकाद्या व्यक्ती विषयी लिहत असताना लेखक त्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसह ओळखत असतो. व्यक्तिचित्रण लिहितांना त्याच्यातील गुणांवर प्रकाश टाकातांना दोषांवरही लेखक लिहीत असतो, परंतू दोषांबाबत लिहितांना, त्या व्यक्तिमत्वावर डाग पडणार नाही अशा पद्धतीने ते लिहिले जात असते. व्यक्तिचित्रण लेखन म्हणजे त्या व्यक्तिमत्वांचे केलेले सप्तरंगी आरेखन. असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी लेखीका आणि समिक्षक डाॅ. अश्र्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. 

दिलीपराज प्रकाशन आणि आडकर फौंडेशनच्या वतीने आयोजित 'मनातील माणसं' या व्यक्तिचित्रण संग्रहाचा प्रकाशन सोहळा डाॅ. अश्र्विनी धोंगडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. हे पुस्तक अखिल भारतीय मराठी प्रकाश संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी लिहलेलं असून दिलीपराज प्रकाशनद्वारा प्रकाशीत करण्यात आले आहे. यावेळी फौंडेशनचे प्रमुख अॅड. प्रमोद आडकर, लेखक राजीव बर्वे, लेखक प्रा. मिलिंद जोशी आणि मधुमिता बर्वे उपस्थित होते. 

डाॅ. अश्र्विनी धोंगडे म्हणाल्या, " मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाची मोठी थोर परंपरा आहे. व्यक्तिचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचे चरित्र नसून ते त्याचे चित्र असते. ते अतिशय थोडक्यात मांडलेले असून 'स्लाईस आॅफ लाईफ' या तत्वाने व्यक्तिचित्रणाचे रेखाटन केले जाते. 

एखाद्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेताना घेतल्या जाणाऱ्या चित्रकलेपेक्षा हे प्रभावी माध्यम आहे. कारण चित्रांत रंगाचे, समजुतीचे तत्सम अडथळे येण्याची शक्तता असते. व्यक्तिचित्रण साहित्य मात्र अशा अडथळ्यांवर स्वार होते. हा साहित्य प्रकार म्हणजे या ह्दयीचे त्या ह्दयी असा प्रवास असतो."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"लेखक राजीव बर्वे यांनी मळलेल्या वाटेवर न चालता नवनव्या वाटांचा शोध घेतला. त्या वाटेवर चालतांना त्यांच्या पायाखाली जशी फुले अाली तशी काटे देखील आले. मुळात माणूस हा गुणदोषांचा संयोग असतो. व्यक्तिचित्रण हे त्या व्यक्तिचे चरित्र नसते, आत्मचरित्र नसते तर त्याच्यातील माणूसपणाचा घेतलेला शोध असतो. तसेच या पुस्तकात लेखकाने रेखाटलेली व्यक्तिचित्रणे ही भावस्पर्शी आहेत."
- प्रा. मिलिंद जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT