पु. ल. देशपांडे रंगमंच, सिटी प्राइड कोथरूड - ‘दिठी’ चित्रपटाचे कलाकारांशी संवाद  साधताना समर नखाते. यावेळी (डावीकडून) पार्थ उमराणी, डॉ. मोहन आगाशे, सुमित्रा भावे, धनंजय कुलकर्णी.
पु. ल. देशपांडे रंगमंच, सिटी प्राइड कोथरूड - ‘दिठी’ चित्रपटाचे कलाकारांशी संवाद साधताना समर नखाते. यावेळी (डावीकडून) पार्थ उमराणी, डॉ. मोहन आगाशे, सुमित्रा भावे, धनंजय कुलकर्णी. 
पुणे

‘दिठी’, ‘धप्पा’ आणि ‘खटला-बिटला’चे किस्से

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आजूबाजूला असणारे, घडणारे विषय घेऊनच मी चित्रपट करतो. मग त्या विषयांमध्ये थोडा नर्मविनोदीपणा आणण्याचा प्रयत्न करतो,’ असे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आज सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) ‘कॅन्डिड टॉक’ या परिसंवादामध्ये ‘खटला-बिटला’, ‘धप्पा’, ‘दिठी’, ‘भोंगा’, ‘वॉकिंग विथ द विंड’ या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा रंगल्या.

मोकाशी यांचे दिग्दर्शन असलेला ‘खटला-बिटला’ हा चित्रपट यंदाच्या महोत्सवात झळकला आहे. ‘आमचे चित्रपटाच्या कथेबाबत बरेच वाद होतात, पण विचारप्रक्रिया ही सारखी व संवेदनशील असल्याने आमच्याकडून चांगले चित्रपट निर्माण होतात,’ असे मत लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.  नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्यासमोर आणणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी ‘दिठी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा अनुभव मांडला. ‘या चित्रपटात सर्व गोष्टी खऱ्या असाव्यात, असा माझा आग्रह होता.

त्यामुळे मी स्थळांपासून ते प्रकाशरचनेपर्यंत सगळ्या गोष्टी खऱ्या कशा दाखवता येतील, याचा प्रयत्न केला. तसेच, हा चित्रपट जीवन-मरण या संवेदनशील विषयाभोवती फिरत असल्याने त्याची संहिताही तितकीच प्रभावी असणे गरजेचे होते. एखादी चांगली गोष्ट करता येत असेल, तर त्यासाठी वेळ घालवू नये,’ असे मत सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.

लडाखी चित्रपट ‘पिफ’मध्ये
‘वॉकिंग विथ द विंड’ हा लडाखी चित्रपट यंदा ‘पिफ’मध्ये दाखवला गेला. एकही थिएटर नसलेल्या लडाख शहराच्या रूपावर, लडाखवासीयांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवली आहे,’ अशी भावना निर्मात्या अनू नारंग यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT