पुणे

'टीस'च्या अहवालाने धनगर समाजात असंतोषत

सकाळवृत्तसेवा

बारामती : टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल नकारात्मक आल्यामुळे धनगर समाजात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. या अहवालासह राज्य शासनाच्या विरोधात आज बारामतीत बिरोबाची जत्रा घालून अभिनव पध्दतीने आंदोलन केले गेले. 

धनगर समाजाला एस टी आरक्षण दिले जावे यासाठी बारामतीत आज धनगर समाजाने बिरोबा देवाची जत्रा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदबुध्दी देण्याचे साकडे घातले. भाजपा सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी प्रदेश युवकचे उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिला.

धनगर समाज अनुसूचित जाती जमातीत असतानाही, धनगर आणि धनगड एकच असतानाही भाजप सरकारने टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेने धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा अहवाल शासनाला दिल्याने भाजप सरकार हा अहवाल उघड करत नसल्याचा आरोप या वेळी केला गेला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मदनराव देवकाते, गणपत देवकाते, संभाजी होळकर, डॉ. इंद्रकुमार भिसे, उत्कर्ष गलांडे, नितीन मासाळ, संपतराव टकले, प्रताप पागळे, दिपक मलगुंडे, सुधीर पानसरे, अभिजीत चव्हाण, पंकज देवकाते, तुषार कोकरे, तुषार लोखंडे उपस्थित होते.

टीस संस्थेने नकारात्मक अहवाल दिल्याने धनगर समाजाची सरकारने घोर फसवणुक केल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे,  यामुळे दसरा मेळावा होताच राज्यभर आंदोलन केले जाणार असुन भाजप मंत्र्यांना राज्यात फिरु दिले जाणार नसल्याचा इशारा या वेळी दिला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT