सिंहगड रस्ता - अरण्येश्वर परिसरातील ऋतुरंग सोसायटीतील सभासदांना सेव्हन मंत्राज फ्रूट बास्केटचे वाटप करताना समितीचे सदस्य.
सिंहगड रस्ता - अरण्येश्वर परिसरातील ऋतुरंग सोसायटीतील सभासदांना सेव्हन मंत्राज फ्रूट बास्केटचे वाटप करताना समितीचे सदस्य.  
पुणे

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केले फ्रूट बास्केटचे वाटप; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे - अरण्येश्वर परिसरातील ऋतुरंग सोसायटीतील घरगुती विलगीकरणात असलेल्या सभासदांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेव्हन मंत्राच्या फ्रूट बास्केटचे वाटप करण्यात आले. सोसायटीच्या फेडरेशन व्यवस्थापन समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. समितीच्या वतीने सकाळ ऍग्रोवन व सेव्हन मंत्राज यांच्या फ्रूट बास्केटला प्राधान्य देण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फळांच्या सेवनाने त्यांच्यातील रोग प्रतिकारक शक्ती वाढीला मदत होईल. तसेच आपण सर्व जण एकाच सोसायटीत राहतो व कोरोना झाल्यामुळे सभासदांमध्ये जी सामाजिक दरी निर्माण होते, ती होऊ नये व सोसायटीत सौहार्दपूर्ण वातावरण असावे, हा या कृतीमागील उद्देश होता, असे समितीच्या वतीने कळविण्यात आले. 

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनिल कबाडे, सचिव संजय देशपांडे, खजिनदार सुभाष टेकवडे व अशोक देशमुख, संग्राम जोशी, रोहन भोसले आदी उपस्थित होते. अशा पद्धतीचा उपक्रम इतर सोसायट्यांनी राबविण्यास हरकत नाही, अशी भावना यावेळी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT