पुणे

स्नेहमय वातावरणात भाऊबीज

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - भाऊ - बहिणीच्या नात्यातील स्नेह वृद्धींगत करणारी भाऊबीज पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. बहिणीने भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी व उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर भाऊ बहिणींनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या.

गेल्या पाच दिवसांपासून तेजोमय आणि चैतन्यदायी वातावरणात सुरू असलेल्या दिवाळीत शुक्रवारी भाऊबीज या सणाने अधिकच रंग भरले. घरोघरी भाऊ - बहिणीच्या नातेबंधाच्या दरवळीने दिवाळी अधिक स्नेहमय झाली. या सणानिमित्ताने धकाधकीच्या जीवनात ‘गेट टूगेदर’ करण्यात आले. सगळी भावंड एकत्र भेटले. घरोघरी भाऊरायाला औक्षण करून बहिणीने या नात्याची पारंपरिक पद्धतीने जपणूक केली. चिमुकल्या भावंडांपासून ते आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करणाऱ्या ज्येष्ठांपर्यंत भाऊबीजेचा सण साजरा झाला.

भाऊबीजेच्या औक्षणानंतर बहीण-भावांच्या गप्पा रंगल्या. ख्यालीखुशाली आणि आपुलकीच्या जगात हे नातं अधिकच गहिरे झाले. दरम्यान, भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी बंधूराजांनी गिफ्ट खरेदी केले. भेटवस्तू खरेदीसाठी सराफी दुकाने, कपड्यांची दुकाने, गिफ्ट शॉपीमध्ये गर्दी झाली होती. डॉल, महागडी कॅडबरी, मोबाईल, कपड्याला चांगली मागणी होती.

 सोशल मीडियावरून शुभेच्छा
‘‘भाऊबीज ही आली... ताई-दादाच्या पवित्र प्रेमाचा सण मायेचा... ओवाळायचा भाऊबीज त्याला म्हणती सारे या सणाला..’’ अशा शब्दात व्हॉट्‌सॲपवरून संदेश पाठवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT