मंचर, (ता. आंबेगाव) : साई दिवाळी फराळ विक्री केंद्राचे उद्‌घाटन करताना सरपंच दत्ता गांजाळे.
मंचर, (ता. आंबेगाव) : साई दिवाळी फराळ विक्री केंद्राचे उद्‌घाटन करताना सरपंच दत्ता गांजाळे.  
पुणे

मंचरला फराळ विक्री केंद्राने महिलांना दिला रोजगार (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावले आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील साई महिला बचत गटाने "ना नफा ना तोटा' या तत्वावर शिवगिरी मंगल कार्यालयात साई दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरु केले आहे.

दर्जेदार आणि खमंग पदार्थ, ते ही स्वस्तात. त्यामुळे ग्राहकही या पदार्थांना पसंती देत आहेत. आर्थिक फायदा होत असल्यामुळे बचत गटातील महिलाही समाधानी आहेत. दररोज दोन टन फराळ तयार करण्यासाठी 50 महिला येथे काम करतात. त्यांनाही हक्काचा रोजगार मिळाला आहे. सोमवार (ता. 12) पर्यंत विक्रीकेंद्र सुरु राहणार आहे.

मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या हस्ते विक्री केंद्राचे उद्‌घाटन बुधवारी (ता. 31) झाले. यावेळी पृथ्वी एन्टरप्रायजेसचे मालक शरद पोखरकर, अरुण बाणखेले, सतीश बेंडे पाटील, बाळासाहेब बोऱ्हाडे, कविता राजेश थोरात, वेणू खरमाळे उपस्थित होत्या. गीतांजली संजय कडधेकर, सोनाली सतीश बेंडे, रेश्‍मा अवधूत शेटे, योगिता सुनील पोखरकर, शीतल किसन दैने, वैशाली शेखर चौधरी या महिलांचा साई बचत गट आहे. त्यांनी फराळ विक्री केंद्र सुरु केले आहे. मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, बेसन लाडू, मका चिवडा, अनारसे, बालुशाही आदी वीस पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT